पान:सफर मंगळावरची.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा मी... तसे ते..../१


 "पळाली सगळी... आता घरी जाण्याशिवाय पर्याय नाऽऽही. खेळून खेळून एवढी भूक लागलीय. घरी गेलं की छानसं गरमगरम काहीतरी खायला मिळेल या आशेनं जावं तर आमच्या प्रेममूर्ती, वात्सल्यमूर्ती अशा मातृमूर्तीने कडकलक्ष्मीच्या अवतारात हातात लाटणे घेऊन, आम्हाला 'आधी बाथरूममध्ये जा.' असं सांगणार. आता, बाथरूममध्ये जायला सांगायला मी काय कुक्कुलं बाळ आहे का? मी चिडून सांगितलं की, मला नाही लागली. तर लगेच वीजेसारखी कडाडेल, हातपाय, तोंड स्वच्छ धुवायला जा म्हटलं. तर काय घरी गेल्यावर आमचं असं स्वागत होणार. पण काय करायचं? उशीर केला तरी, का उशीर केला म्हणून रागावेल. नाहीच गेलो तर... पण भूक जाम लागलीय. शेवटी रागावली तरी पोटभर जेवायला देणारच. आम्ही मुलं खूप खायला लागलो की

सफर मंगळावरची । ९१