पान:सफर मंगळावरची.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाळ आहे याची तिला काहीही क्षिती नसते. ती तसा विचारच करत नाही. ती पाळणा उलटवते अन् बाहुलीला पाळण्यात झोपवते. बाळ खाली पडणार तोच हेलनचा मोठा भाऊ जेम्स त्याला सूर मारून झेलतो. केट 'हेलन' म्हणत ओरडते. पण हेलनला याचे काय ? ती आपली बाहुलीला जो, जो करते. केट तिला पाळण्यापासून बाजूला करते.
 "हेलन, असं काय करतेस, कसं सांगू तुला?"
 " जनावरांना सांगून कळत नाही. फटके मारून शिस्त लावावी लागते."
जेम्स म्हणाला.
 " काय बोलतोस जेम्स, तुला काय कळतं का ?” केट.
 "बरोबर बोलतोय. तुम्ही तिचे फार लाड चालवलेत. नको ते भरपूर कळतं तिला. "
 हेलनचे वडील ऑर्थर बाहेरून आले. घरातलं वातावरण पाहून त्यांनी विचारले,
 "काय झालं?"
 "हेलनने पाळणा उलटवला. " जेम्स म्हणाला.
 " काय करावं, मारलं तरी कळणारेय का, कशी शिस्त लावावी ?"
 "केट, हेलन आता मोठी होऊ लागलीय. तिला घरात ठेवून चालणार नाही. दिवसेंदिवस धोक्याचं होणारेय. "
 " तुम्हालाही तसंच वाटतं, माझ्या पिलाला तिकडे लांडग्यांच्या स्वाधीन करायचं ?"
 केटने हेलनला जवळ घेतले. हेलन तिच्या चेहेऱ्यावरून हात फिरवते. तिलाही बोलायचं असतं पण जमत नाही म्हणून आईच्या तोंडावर हात मारते. लाथा झाडते, हात पिळते.
 "बघ कशी जनावरासारखी वागणूक आहे तिची. तिला आपण एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ठेवू या.” ऑर्थर म्हणाले.
 "अगं त्या बाल्टीमोरच्या डॉक्टरांना पत्र लिहून तरी बघा. त्यांनी खूप जणांचे डोळे चांगले केलेत."
 मावशी आपली बास्केट आवरीत म्हणाल्या.
 "आता डॉक्टर काय चमत्कार करणारेयत. किती दिवस असे खिसे भरायचे डॉक्टरांचे. माझ्याकडे एवढा पैसा नाही आता." ऑर्थर केलर हताशपणे म्हणाले.

 "एवढं शेवटचच लिहून बघू या. असेल नशीबात तर ठीक नाहीतर दुसरा

सफर मंगळावरची । १८९