पान:सफर मंगळावरची.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुभव येतो.
 चौथे बलस्थान म्हणजे प्रासादिकता !
 मुलांच्या मनोवृत्तीला साजेसे शब्द, साजेशी रचनाशैली वापरून तुम्ही या सर्व कथा लिहिल्या आहेत. प्रासादिकता हा लेखनगुण साहित्यकृतीच्या यशस्वितेसाठी मूर्धन्यस्थानी असणारा गुण आहे. तो तुमच्या लेखनात ओतप्रोत भरलेला आहे.
 पाचवे बलस्थान म्हणजे बालभावविश्वाची समृद्धता !
 या कथा ज्यांच्या आहेत त्यांचं भावविश्व तुम्ही नेमकं जाणलं आहे.
 आता एक उणीव मात्र निदर्शनास आणतो.
 असा मी हे... कथासप्तक जे तुम्ही लिहिले आहे ते सुटे सुटे तितके प्रभावी वाटत नाही. उलट ती एक दीर्घकथा वाटते. त्यामुळे त्या कथांना वेगळे क्रमांक देऊन तुम्हाला काय साधायचे आहे याचे नीटसे आकलन होत नाही, आणि त्याचे प्रयोजन समजत नाही.
 तरिही ...
 या कथासंग्रहाचा वाचनोत्तर परिणाम उत्तमच होत आहे. मनोरंजन आणि प्रबोधन असा दुहेरी विधायक लाभ होतो. या कथासंग्रहाचे स्वागत शिक्षक, पालक, शिक्षणाधिकारी, विविध शिक्षणसंस्थाचे चालक आणि जागरूक नागरिक यांनी भरभरून करावे अशी इच्छा व्यक्त करतो.
 आपल्या लेखनकार्याला शुभेच्छा !

१०१३, सदाशिव पेठ,
'गंधाली ', पुणे ४११०३०
मो. ९२२६५७५२९०

डॉ. न. म. जोशी