पान:सफर मंगळावरची.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अफगाणिस्तानात यावं लागेल.'
 "हो, हो मी यायला तयार आहे. पण येऊ कसा?"
 "आमचे विमान तुला न्यायला येईल. तू अगदी मोकळं यायचं. तुझ्या रक्षणाची जबाबदारी आमची. पण भारतातून तुला विमान इकडे आणू शकणार नाही. तेव्हा तू, अमेरिका, कराची, दुबई, सिंगापूर वगैरे देशातल्या कुठल्याही विमानतळावर एकटा ये."
 "बरं, बरं, मी प्रयत्न करतो. "
 रोहितने फोन ठेवला. पण परदेशांत जायचे कसे हाच मोठा प्रश्न पडला. बाबांनी विचारलं,
 "काय म्हणला मग, ओसामा बिन लादेन. "
 "इकडे या मग देतो म्हणाला, मुलाखत."
 "जा की मग."
 "कसं जायचं ओ बाबा ?"
 "अरे पासपोर्ट, व्हिसा लागतो परदेशात जायला ते मिळेपर्यंत दोन वर्ष जातील. तू आपला त्याचा नाद सोड. "
 "बाबा, मला त्याला विचारायचंय, माणसं मारणं हे खऱ्या धर्माचं काम आहे का ?"
 "त्याला असं विचारशील तर तुलाच मारेल तो!”
 "मघाशी त्यांनी फोनवर सांगितलंय ना, रक्षणाची जबाबदारी त्यांचीय म्हणून. "
 " अरे पण तुला एकट्याला मुळीच नाही पाठवणार आम्ही.”
 रोहित मग आईकडे गेला. तिला म्हणाला, "आई, दुबईला आपलं कोणतरी आहे ना गं ?"
 " आहेत. खूप लांबचे नातेवाईक आहेत ते. म्हणजे बघ, माझ्या मावसबहिणीच्या नवऱ्याची आतेबहिण का कोण तरी आहे. दागिन्यांनी झगमगत होती. म्हणूनच लक्षात राहिली. "
 "आपण त्यांच्याकडे जाऊया का?"
 "खुळा की काय, ओळखही नाही. खर्च किती येईल त्याचं काय ?"
 "मग मी एकटाच जाईन. त्याशिवाय मला त्याची मुलाखत घेता येणार नाही."

 " अरे पण तू अजून किती लहान आहेस. त्या खतरनाक आतंकवाद्याची

सफर मंगळावरची । ७१