पान:सफर मंगळावरची.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उच्चारायला सुटसुटीत आणि अर्थपूर्ण असं, 'सप्ततारा' हेच नाव नक्की झालं. आई म्हणाली, "आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमकायला हवीत माझी ही सात पोरं. "
 "मी ओसामा बिन लादेनची मुलाखत घेणार. "रोहित म्हणाला.
 "हॅ ऽ हॅ ऽ बघा आलाय शत्रुची मुलाखत घेणारा. "केतन म्हणाला.
 "शत्रुची मतं नको का कळायला ? या लढाईच्या मागे तो का आहे हे तरी जगाला कळेल." रोहित.
 "पण तू जाणार कसा त्याच्यापर्यंत ?” विनय.
 "मी आधी त्याला फोन करीन. "
 सगळेजण खीं ऽ खीं ऽ करून हसायला लागले. रोहित उठला, घराकडे निघाला. तेजसने हाक मारली. पण त्याने मागेही वळून बघितले नाही. घरी आल्यावर त्याने आंतराष्ट्रीय फोनची दैनंदिनी बाबांच्याकडून मिळवली. रोहितचे बाबा सी. आय. डी. क्राईम गुन्हे अन्वेषण विभागात डी. एस. पी. असल्यामुळे त्याला हे सहज जमले. त्याने बाबांच्या मदतीने बिन लादेनला फोन लावला. आश्चर्य म्हणजे फोन लागला. पण त्याच्याशी बोलणार कुठल्या भाषेत ? बाबा म्हणाले
 "हिंदीत बोल. दुभाषाकरवी. आता बील किती येईल या काळजीने माझ्या छातीत तोफगोळे उडू लागलेत. "
 "बाबा ऽ प्लीज. बाबा, मी रोहित ऐवजी रोशन नाव सांगू का ?"
 " त्याने काय फरक पडणारेय ?"
 "बघाच तुम्ही."
 "हॅलो 5"
 "मैं रोशन बात करता हूँ."
 "कहाँ से s" पलीकडून प्रश्न.
 "भारत सें."
 "काय काम?" इंग्रजीतून प्रश्न.
 "हे पहा मला इंग्रजी बोलता येत नाही. मला ओसामा साहेबांशी बोलायचं आहे. आमच्या, 'सप्ततारा' साठी मुलाखत घ्यायचीय."

 बऱ्याच वेळाने पलीकडून हिंदीत बोलणे ऐकू येऊ लागले. पुष्कळ चौकशी केली. शेवटी, 'ओसामा बिन लादेन मुलाखत द्यायला तयार आहेत. आपणाला

७०