पान:सफर मंगळावरची.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ओसामा बिन लादेन याच्याबद्दल वर्तमानपत्रात वाचलं होतं. विसाव्या शतकातला व्हिलन, त्याचे ते थरारक जगणे, रोहितला सारखे रोमांचित करत होते.
 'एवढा साधा रहाणारा अल्लाचा भक्त इतका निष्ठुर कसा होऊ शकतो? अल्ला त्याला सद्बुद्धी देत नसेल का?' असे प्रश्न मनात घोळवतच रोहित झोपी गेला. त्याच विचारांचे स्वप्न त्याच्या कोवळ्या डोळ्यात अवतरू लागले. त्याला स्वप्न पडले,
 'रोहितने आणि त्याच्या मित्रांनी एक हस्तलिखीत अंक काढायचे ठरवले. मोठ्या, मोठ्या हिरो, कलावंत, लेखक यांच्या मुलाखती घेऊन ते अंकात छापायचे. अंकविक्रीतून मिळणारे पैसे कारगिल युद्धाला पाठवायचे. हस्तलिखिताचे नाव, 'सुपर सेव्हन' असे ठेवायचे ठरले. सातजण होते ना म्हणून. रोहितची आई म्हणाली,
 "अरे मराठी नाव ठेवा की. आपण मराठी माणसं ना!"
 मग सगळेजण विचार करू लागले. तगडं नाव काय ठेवायचं ते. सोप्पं पण. पाहिजे, तोंडात बसायला पाहिजे. वगैरे, वगैरे, एकेकाच्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघायची. उत्तम सात, सप्तनायक, सप्तक, सप्तसूर, शक्तीसात, सप्तशती, सप्तमी, सप्तर्षी, सप्तगण, सप्ततारा. असे एकेकजण नाव सुचवायचे. शेवटी

सफर मंगळावरची । ६९