पान:सफर मंगळावरची.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" काय आई, दूध प्यायल्यावर मिसळ, केकला इथे जागा राहिल का ?" पोटाकडे हात दाखवून मिलींद म्हणाला, " झोपताना पिईन. " "बरं बाबा." आई तिच्या कामाकडे वळली. अनिलच्या आईनं मिसळ, केक, गुलाबजामून, चॉकलेट असा मस्त बेत ठेवलेला. आग्रह करकरून सर्व मुलांना खाऊ घातलं. मिलींद घरी आला. तो अंथरूणावर आडवाच. दूध नाही की केळ नाही. अभ्यास उद्या सकाळी लवकर करतो म्हणाला. सकाळी लवकर उठून अभ्यास पूर्ण केला. आईने केलेली पोळीभाजी कशीतरी पाण्याच्या घोटाबरोबर गिळली नी शाळेत गेला. शाळेच्या जवळच कोपऱ्यावर चाट गाडी होती. तिथं मधल्या सुट्टीत चाट खाल्ला. डबा तसाच राहिला. घरी आल्या, आल्या आईपुढे डबा ठेवत म्हणाला, "आई, किती गं तिखट उसळ होती. मी नाही खाल्ला डबा. मला भूक लागलीय. पटकन काहीतरी खायला दे ना. " मिलींदचा कांगावा लक्षात यायला आईला वेळ नाही. तिही आताच दमून आलेली. . "मिलींद आत्ता दूध घे. तोपर्यंत मी करते काय तरी. " गॅसवर एका बाजूला दूध आणि एका बाजूला चहाला आधण ठेवत आई म्हणाली. " नुसत्या दुधाने ढवळतं पोटात. बिस्किटं तरी आहेत का ?" "नाही रे संपलीत. असली म्हणजे पोटभर खातोस." "आई, किती भूक लागलीय!" मिलींद रंडकुंडीला आला. "मग डबा खा ना. " " तिखट जाळ उसळीचा डबा नको मला.' 12 सफर मंगळावरची ६५