पान:सफर मंगळावरची.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 साने गुरुजी दापोलीला असताना, आईला भेटण्यासाठी भर पावसात, भरल्या ओढ्यातून, वादळ, अंधार असताना कसे आले. शिक्षणासाठी कुठे कुठे गेले, कसे राहिले, नंतर म्हणाली, तूच वाच ना पुस्तक, बघ की पूर्वीच्या लोकांना शिकण्यासाठी किती कष्ट पडायचे. केवढं खडतर आयुष्य होतं त्यांचं.
 सुरुवातीला थोडं वाचून दाखवलं, नंतर त्याचं तो वाचू लागला. एखादा शब्द अडला तर आई किंवा बाबा अर्थ सांगायचे. पुस्तक वाचल्यापासून श्रीचा किरकिरा स्वभाव हळूहळू कमी झालाय. आता तो वेळेवर उठतो, मैदानावर खेळायला जातो, सूर्यनमस्कार घालतो, पोटभर असेल ते जेवतो. घरात असला की आईला मदत करतो. सगळ्या सोसायटीत श्री हा एक आदर्श मुलगा झाला आहे.
 हा चमत्कार 'श्यामची आई' या पुस्तकाने झालाय की काय? म्हणून श्रीच्या आईनं 'श्यामची आई' पुन्हा नव्या जाणीवेनं वाचून काढलं. त्यामुळे तिच्यातही बदल झाला. ती घरात चिडचिड करेनाशी झाली. मदतनिसाबरोबर आपुलकीनं वागू लागली. खाडे केले तरी रागवेनाशी झाली. हल्ली घरात बरीच शांतता, प्रेमळ वातावरण पाहून बाबा मात्र बुचकळ्यात पडलेत, हा काय चमत्कार आहे म्हणून!

***
सफर मंगळावरची । ५९