पान:सफर मंगळावरची.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “मग काय होतं ??
 "मग ती आणखी काम करते, आपण हुशार होतो. त्यामुळे आपण चांगले
नाही का जगणार!"
 गौरवला पाणी देत आई म्हणाली.
 "हो, पण मला वाचायचा खूप कंटाळा येतो, झोपच येते."
 "टी. व्ही. बघताना नाही येत ?”
 "अजिबात नाही. उलट पळून जाते. "
 "बरं, मी तुला रोज गोष्ट वाचून दाखवीन."
 “खरंच?” गौरवने खूश होत विचारले.
 "खरंच. नंतर मात्र तुझं तुलाच वाचायला हवं."
 "चालेल."
 गौरव बाहेर पळाला. आता मिनी, टिटू, सोनू सगळ्यांना सांगत बसणार.
म्हणजे दवंडी पिटणार.
 गौरवच्या आईनं लहान लहान गोष्टींची पुस्तकं काढून, कुठलं कसय ते जरा चाळून ठेवलं.
 संध्याकाळी बाबा आले की, लगेच दूध पिता-पिता गौरव म्हणाला, "बाबा, बाबा आई आता मला रोज गोष्ट वाचून दाखवणार आहे."
 "अरे वा ऽ चांगली गोष्ट हीच! पण आम्हाला जेवायला मिळणार ना?"
बाबा आईकडे पहात म्हणाले.
 “तुम्हीच तुमचे जेवण करायचे, आजपासून.” गौरवने दूध पिऊन पेला धुऊन

सफर मंगळावरची । ५५