पान:सफर मंगळावरची.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "आत्या, आम्हाला खाऊ पण मिळायला हवा." तोंडात भडंगाचा बोकाणा भरत श्री म्हणाला.
 "हो हो, असं सर्वांनी मिळून काम केलं की खाऊ तर मिळणारच की !”
 "ये पण आत्यांनाच सारखा सारखा त्रास नको हं.” ज्योतीताई म्हणाली.
 “चालेल. आम्ही आमच्या घरचा खाऊ आणून, तो सगळे मिळून बाहेरच्या बाहेर स्वच्छ केलेल्या जागेत खाऊ." केतन म्हणाला.
 "तोपर्यंत बाग तयार होतेय." अपूर्वा म्हणाली.
 अशाप्रकारे दर रविवारी साफसफाई करण्याचे ठरवून मुले खेळायला पळाली.

***
सफर मंगळावरची । ५३