पान:सफर मंगळावरची.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रमदानातही मनोरंजन दिवाळीची सुट्टी नुकतीच संपून शाळा सुरू झालेली. अभ्यासाचा म्हणावा तितका काच सुरू झाला नव्हता. रविवारी मुलं जेवून झाल्यावर थंडी वाजतेय म्हणून उन्हाला कठड्यावर गप्पा मारीत बसलेली. तेवढ्यात स्वप्नाली शिकवणीच्या वर्गावरून आली. मुलांनी दंगा केला. तिची नवी स्कुटी नुकतीच आणलेली. केले. "स्वप्नालीदीदी, आम्हाला गाडी दे ना, एकच चक्कर मारतो." वगैरे सुरू तिच्या चेहऱ्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. ती खूपच घाबरलेली दिसत होती. तिला काहीतरी सांगायचे होते. पण मुलांनी नुसता गलका केला. रोहनच्या लक्षात आले. तेव्हा रोहन म्हणाला, " स्वप्नालीदीदी तू का घाबरलीस, काय गं झालं ?" "अरे केवढा मोठ्ठा साप त्या वळणावर आडवा गेला. " "बाप रे ss" असं म्हणत मुलं चिडीचीप. "जोरात पळत होता. ब्रेक दाबला कचकन तर असा पुढून गेला. मी पडलेच असते पण वाचले.... पिवळाधमक होता. " स्वप्नालीचं बोलणं ऐकून आत्या बाहेर आल्या. त्यांनी विचारल्यावर स्वप्नालीने पुन्हा एकदा तोच पाढा वाचला. ह्याचे त्याला, त्याचे ह्याला करता करता सोसायटीत सगळ्यांना कळले. स्वप्नालीच्या गाडीला साप आडवा गेला. मग सगळ्या सफर मंगळावरची । ५१