पान:सफर मंगळावरची.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणाली.
 "तुम्ही करा आराम."
 सौरभ चिडून नीमाला म्हणाला. त्याला ताईनं हुकूम केलेला अजिबात आवडला नाही.
 "मी कणीक मळून चपात्या करतेय. भाजी पण करणारेय. तोपर्यंत घास भांडी."
 नीमाने पीठाचा डबा, पाणी, परात घेतली. दोघांची स्वयंपाकघरात खुडबुड चाललेली. तेवढ्यात दारावरची घंटी वाजली. नीमाने दार उघडले तर शेजारच्या काकू.
 "काय चाललंय. गावावरून कधी आलात ?"
 अशी चौकशी करत आई झोपली होती तिथं जाऊन बसल्या. स्वयंपाकघरातून मुलांचे तोंड आणि भांडी दोन्हीचे आवाज येत होते. काकू म्हणाल्या,
 "मुलं काय करताहेत."
 "चाललंय काय तरी."
 "बघते तरी."
 "काकू उठून बघताहेत तर नीमा चपात्या करतेय अन् सौरभ भांडी घासतोय. आश्चर्याने काकू ओरडल्या,
 "सौरभ तू भांडी घासली ?"
 "हो 5 ताईनं स्वयंपाक केला, तोपर्यंत मी घासली भांडी, आज आईला सुट्टी."
 काकू जवळ येऊन बघू लागल्या नीमाच्या चपात्या फुगत होत्या. करपत नव्हत्या. सौरभही व्यवस्थित चोळून भांडी धूत होता. आणि जाळीच्या टोपलीत पालथी घालत होता. काकू कौतुकाने म्हणाल्या.
 "काय हुशार आहेत हो तुमची मुलं!"
 "होच मुळी. माझी मुलं आहेत ती !"
 आईही उठून आलेली. दोन्ही मुलांची गडबड बघत होत्या. आई म्हणाली,
 " यासाठी तरी कधी कधी आजारी पडावं. "

***
५० / सफर मंगळावरची