पान:सफर मंगळावरची.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आई पडते आजारी


 सकाळी मुलांच्या डोळ्यावरची झोप काही जात नव्हती. डोळे उघडले तरी पुन्हा गपकन झाकत होते. तेवढ्यात, 'ऑक्; ऑक्' असा आवाज ऐकून नीमा, सौरभ पटदिशी उठून धावतच आवाजाच्या दिशेने बेसीनकडे गेले. बघताहेत तर आईच्या उलट्या सुरू. ते पाहून निमालाही मळमळायला लागलं. ती पुन्हा खाटेवर येऊन बसली. सौरभ कावराबावरा होऊन आईकडं पहात तिथेच घोटाळला. निमा म्हणाली,
 "सौरभ, आईचं डोकं धर."
 सौरभला वाटलं आईला बाळबिळ होतय की काय... सौरभ आईचं डोकं धरू लागला. त्याचे हातही डोक्यापर्यंत पोहचत नव्हते. आईनं हळूच नको म्हणून हात बाजूला केला. चूळ भरली. तोंडावर पाणी मारले आणि पुन्हा कॉटवर येऊन पडली.
 "आई, चहा करून देऊ का ?" नीमा म्हणाली.

सफर मंगळावरची । ४७