पान:सफर मंगळावरची.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणाली. "बायसाब, पेढं घ्या."
 "कशाचे पेढे ? " ईश्वरीच्या आईला वाटलं सुमा लिहिती वाचती झाली म्हणूनच तिच्या आईनं पेढे आणलेत. सुमाच्या आईनं ईश्वरीच्या आईच्या हातात पेढ्यांचा पुडा देत म्हणाली,
 "आवो सुमाचं लगीन ठरलं."
 "अरे वाऽ सुमा ऽ काही बोलली नाहीस? आता काय मग जाणार सासरी !" पेढा तोंडात टाकत ईश्वरीची आई म्हणाली. सुमा लाजत, गालात हसत, तिच्या पाया पडली.
 "लिहणं, वाचणं सोडायचं नाही पण !"
 "आता कसं वं जमायचं ?"
 "न जमायला काय झालं ? नांदायला गेल्यावर बघ आईची किती आठवण येते. मग तेव्हाच पत्र लिहायचं आईला. बघ लेक भेटल्याचा आनंद होईल तिला."
 "व्हय बायसाब तुमच्यामुळं तेवढं जमलं बघा.'
 " मला पण पत्र पाठवायचं कळ्ळं!” ईश्वरीनं असं म्हणताच सुमा लाजून पळाली.

***
४४ / सफर मंगळावरची