पान:सफर मंगळावरची.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आईला पत्र ल्हिवायचं


 " ए आई, मी बघ शी ऽ री काढला."
 ईश्वरी टुलुटुलु धावत आली. हातात पाटी न् पेन्सिल घेऊन धावताना तिची त्रेधा तिरपिट उडत होती. पण तिला आई कुठं दिसेना. सुमा दोरीवर कपडे वाळत घालत होती.
 "शुमा ऽ ए शुमा ऽ बघ ना मी शी ऽ री काढला."
 "बघू बघू अगो बया ऽ आता आमची इशूताई ल्हिवायला लागली की." सुमा कौतुकाने म्हणाली. तेवढ्यात ईश्वरीची आई आली. तिच्याकडे पळतच ईश्वरी गेली.
 'आई ऽ ऽ' असं म्हणत तिच्यासमोर पाटी धरली ईश्वरीनं.
 "छान काढलास की 'श्री' सुमा, तर काढून दिला नाहीस ना?"
 आईनं सुमाला विचारलं. आजच, अगदी मघाशीच तर 'श्री' शिकवला आणि लगेच कसा काय काढता आला ईश्वरीला. म्हणून सुमाने काढला की काय असंच आईला वाटलं.
 "न्हाय बया, मला ल्हिवायावाचाया तरी येतंय का?" सुमाने भांड्याचे घमेले बाहेर नेत म्हटलं.
 "सुमा, तुला लिहितावाचता येत नाही ?" ईश्वरीची आई आश्चर्याने म्हणाली.
 "न्हायी." सुमा मागे पुढे डोलत भांडी घासता घासता म्हणाली, "शिकून तरी काय उपेग ?"
 दुसऱ्या दिवशी ईश्वरीच्या आईनं नवीन पाटी आणली. सुमाची कामं आटोपल्यावर तिला चहा दिल्यावर म्हणाली, "चला आता थोडा अभ्यास करू या."
 संध्याकाळची वेळ, सगळी कामं आटोपली होती. त्यामुळे सुमा पण ईश्वरीजवळ बसली.

 पाटी तिच्या हातात देत आई म्हणाली, “सुमा, तू पण 'श्री' काढायला शिक. "

४२