पान:सफर मंगळावरची.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "काकी तुम्ही लगेच कशा काय बऱ्या झालात?" महेश म्हणाला. "
 त्यांनी वेळेवर औषधं खाल्ली असतील." मिलींद म्हणाला.
"फक्त दोन गोळ्या खाल्ल्या आईनं, डॉ. माधवीताईनं दिलेल्या." मुन्ना म्हणाला.
 "फक्त दोन गोळ्यात काकी बऱ्या झाल्या?" गोपू आश्चर्यांने म्हणाला. "आमची आजी जरा अंघोळ करताना पाय घसरून पडली तर तिचा खुबाच मोडला. आता झोपूनच असते.” शामल म्हणाली.
 "हो, मी ऐकलंय, वयस्कर माणसांचे लगेच हाड मोडते. "ज्योती म्हणाली.
 " अरे माझ्या लेकरांनो, मी रोज योगासने करते ना. त्यामुळेच माझी हाडं दणकट झालीत. कुठं रक्त आलं नाही की हाड मोडलं नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला भीती वाटत होती ती डोक्याला मार लागल्यामुळे माझी स्मरणशक्ती जातेय की काय. पण अजून तरी ती शाबूत आहे. मला तापसुद्धा आला नाही. हे सगळं योगासनामुळं झालं आहे."
 "काकी, आम्हाला पण शिकवा की योगासने." कुलदीप म्हणाला.
 "मग आम्हीपण दणकट होऊ." अनिल म्हणाला.
 "हो, हो, एका पायावर तयार आहे तुम्हाला शिकवायला." असं म्हणत काकींनी पाय उचलताच, डाव्या पायात कळ आली. "अया 55 ई ss" करत त्यांनी पाय खाली ठेवला. सगळी मुलं हसू लागली.

***
सफर मंगळावरची । ४१