पान:सफर मंगळावरची.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दणकटपणा


 काकींचं घर म्हणजे मुलांना मुक्तद्वार. कधीही या. बसा, पाणी प्या. घरात काही खाऊ असला तर काकी आग्रहाने खायला घालत. साध्यासुध्या वयस्कर काकी मुलांच्यात रमायच्या छान. रोज पहाटे फिरायला जायच्या. योगासनं करायच्या. ' बाजाची पेटी वाजवत गाणी, भजनं म्हणायच्या. आधुनिक गोष्टी मात्र त्यांना जमत नसत. त्यांची मुलं आपापल्या व्यापात असत, आपापल्या मित्रमैत्रिणींत रमत. काकींना मग एकटेपणा जाणवत असे. म्हणून मग त्या हल्ली महिला मंडळात जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे मिटींगला वगैरे जाताना त्यांना स्वत:ची दुचाकी तरी असावी असं वाटू लागलंय. बसथांबा घरापासून बराच लांब . असल्यामुळं सारखं कुणाला तरी, मला सोडा असं सांगावं लागतं. रिक्षाने जा ये फारसं परवडत नाही. त्यांनी एकदा ठरवलं; आपणच गाडी शिकावी म्हणजे कुणाला लोणी लावायला नको, मला इकडे सोडा, तिकडे सोडा, असं नको.
 एकेदिवशी सगळी काम आवरून झाल्यावर काकी मुन्नाला म्हणाल्या,
 "चल रे मला शिकव गाडी. "
 मुन्नाने स्कुटी काढली. कशी कशी चालवायची ते सगळं समजावून सांगितलं, पण गाडीवर बसल्या की काकी एवढ्या घाबरायच्या की बस्स, सगळ्या कॉलनीभर


सफर मंगळावरची । ३९