पान:सफर मंगळावरची.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "सगळं जमतं. शिकलं की सगळं येतं. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' ही माणसांची म्हण मी खूपदा ऐकलीय. माणसं तर किती काय करतात."
 "तू म्हणतोयस तर शिकेन. पण फी काय द्यायची रे?"
 "फी देण्याचा प्रकार माणसांत असतो."
 " माणसाप्रमाणं शिकायचं तर फुकट कशाला ?"
 "अगं ज्ञान हे दान करण्याची गोष्ट आहे, विकायची नाही. "
 " तू तर माणसासारखाच बोलायला लागलास. पण माणसं आता फुकट काहीच शिकवत नाहीत. "
 "तुला बरंच माहितीये की माणसांबद्दल ?"
 " मग, माणसांचं प्रमाणच एवढं वाढलंय आता, कुठही गेलं तरी माणसं दिसतातच आणि त्यांचं बोलणं कानावर पडतंच. "
 "तुला आणावसं वाटलं तर फळं आणत जा."
 "चालेल. आणखी कोण येतं का रे?"
 "हो सकाळी गोटू करडू येतं. आणखी चिंकूससूल्या, मिठूपोपट येतात."
 " मिठू कसा रे वाजवतो तबला ?”
 "तो तबला नाही वाजवत. ती बाजाची पेटीये ना ती चोचीनं वाजवतो. चोचीनं तबला वाजवला तर फुटेलच."
 "ते काय फी देतात का रे, की नुसताच टाइमपास ?"

सफर मंगळावरची । २७