पान:सफर मंगळावरची.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

" माणसाने ठेवला तर चालतो वाटतं?"
 “एकीकडे माणूस बुद्धीच्या जोरावर काय, काय मिळवत चाललाय. दुसरीकडे असल्या फालतू अंधश्रद्धा पण जोपासतो आहे. त्यामुळे त्यांच्यातल्या त्यांच्यांत हेवेदावे, द्वेष, मत्सर वाढत चाललाय. लोभ, मोह वाढताहेत. मग त्यामुळं शांती मिळत नाही. "
 "मला काय करायचंय त्यांच्या या गोष्टीचं. मला गोरं होण्याची तीव्र इच्छा आहे. एवढंच."
 "तुला माहितीय, अशा तीव्र इच्छेतूनच किंवा गरजेतून माणसाने नवनवीन शोध लावलेत. "सफर मंगळावरची । २३  "ए, बगळ्या तुला पण माझ्यापेक्षा जरा जास्तच बुद्धी आहे ना. मग लाव ना माझ्यासाठी हा शोध. तू खरा मित्र ना माझा ?"
 " असा लावतो म्हणून थोडाच शोध लागतो?"
 " प्रयत्न तरी कर."
 " हरकत नाही. प्रयत्नाना यश मिळू शकतं."
 असेच नेहमीसारखे दिवस जात होते. कावळा आणि बगळा मात्र सतत विचार करत होते.
 एके दिवशी बगळा एका पायावर उभा राहिलेला, डोळे झाकून. कावळा म्हणाला,
 "अरे, असा काय उभा राहिलायस, आता काय मासे मिळणारेत का ?"
 "मी तपश्चर्या करतोय." बगळा म्हणाला.
 "कशासाठी ?'
 " तू गोरा, पांढराशुभ्र होण्यासाठी देवाकडे वर मागणारेय. "
 "एक तप म्हणजे किती वर्ष माहितीय का तुला ? तब्बल बारा वर्ष. तोवर आपलं आयुष्य संपून जाईल."
 "मग काय करायचं ?"
 " त्यापेक्षा आपण प्रयोग करून वेगवेगळे साबण शोधून काढू." कावळ्याने डोके चालवले.
 " तू कधी, कधी फारच डोकं असल्यासारखं बोलतोस."

 “मऽग. माणसाचं उष्टंखरकटं खाऊन माझ्या पण मेंदूत थोडीफार वाढ झालीच असेल की." कावळा ऐटीत म्हणाला.

सफर मंगळावरची । २३