पान:सफर मंगळावरची.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नेहमीपेक्षा कमीत कमी अंतर आहे. "
 "किती ?"
 " तीन लाख, छपन्न हजार सातशे त्रेपन्न किलोमीटर एवढेच आहे."
 "नेहमी किती असतं?" ऋतुजा म्हणाली.
 “तसं अंतर कमी जास्त होते. पण उद्याचं खूपच कमी आहे. त्यामुळे नेहमीच्या चंद्रबिंबापेक्षा उद्याचे चंद्रबिंब चौदा टक्के मोठे दिसणार आहे. चंद्राचा परावर्तीत होणारा प्रकाश सात टक्के जास्त असेल. म्हणजेच उद्याचे चांदणे यापेक्षाही तेजस्वी असेल."
 बाबा असे सांगताना ऋतुजा, हृषीकेश, आई जेवायचं थांबवून ऐकत होते. जरा वेळानं आई म्हणाली.
 "चला जेवा, खा पटपट, गार झालं सगळं. "
 "आजचं जेवणही छान अन् गप्पाही छान झाल्या." बाबा म्हणाले.
 “हळू नवीन माहिती मिळाली की, बौद्धिक भूक भागते." आई म्हणाली.
 "उद्या पण यायचं का जेवायला ?" ऋतुजा म्हणाली.
 "मघाशीच ठरलंय ते. मी रोहन, केतन निखील, श्रीला बोलवू का." हृषीकेश म्हणाला.
 "मी पण स्वप्ना, प्राचीला बोलावते. "

 "बोलवा की, मी भोपळ्याच्या घाऱ्या, काळ्या वाटाण्याची उसळ करते. गार झालं तरी चालेल." आई म्हणाली.

सफर मंगळावरची । १७