पान:सफर मंगळावरची.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकदम उतरू शकता. मंगळावर पाऊल ठेवताच दोघांना अतिशय आनंद झाला. दोघेही जोरजोरात खिदळू लागले. उड्या मारू लागले. 'हाय रब्बा, हाय रब्बा' असं म्हणत हात उंचावून नाचू लागले. त्यामुळे सौरभचा मास्क सरकला. त्याला गुदमरल्यासारखे होऊ लागले. पटकन् मानसीने त्याचा मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बसवला. सौरभ पुन्हा श्वासोच्छवास करू लागला. इकडे पृथ्वीवर ते दृश्य पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. पृथ्वीवरून त्यांना संदेश पाठवण्यात आला.
 "उगीच वेळ घालवू नका. फक्त दोन तास मंगळावर काढायचेत. तुम्ही मंगळावर पहिले पाऊल ठेवलेत. म्हणून प्रथम तुमचे अभिनंदन. मानवाचे पहिले पाऊल मंगळावर पडले जगात तुमचं नाव अमर राहील. आता कामाला सुरुवात करा."
 दोघांनी आनंदाच्या उधाणाला आवर घातला. तेथील लालसर माती, गोटे, गोळा करण्यास सुरुवात केली. फोटो घेतले. काही ठिकाणी उकरून पाहिले पण फारसा उपयोग झाला नाही. दीड तास झाला. पृथ्वीवरून काहीच कसा संदेश येईना म्हणून सौरभने पाहिले, तर सर्व यंत्रणा ठप्प अति पावसामुळे संपर्क तुटलेला. आता निघायची वेळ झाली. दोघेही डोळ्यात जीव आणून मंगळभूमी पाहात होते.
 "हे मंगळग्रहा तू तर साधा दगडमातीचाच आहेस. अगदी पृथ्वीसारखाच. तरी तुला पृथ्वीवासी का घाबरतात? आम्ही सर्वांना सांगू मंगळ पूर्वी पृथ्वीप्रमाणेच होता. उष्णतेमुळे किंवा अन्य कारणामुळे येथील जीवसृष्टी नष्ट झालीय. पृथ्वीवरही प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादींचा प्रचंड धोका वाढलाय. पृथ्वी उष्ण व्हायला लागलीय. उष्णतेमुळे बर्फ वितळले तर सगळीकडे पाणीच पाणी होईल. मग पृथ्वीवरीलही जीवसृष्टी नष्ट होईल. पृथ्वीवरचे पर्यावरण सांभाळायला हवे नाहीतर पृथ्वीचा मंगळ होईल. मंगळग्रहा आता मात्र तुझी भीती वाटत नाही. भीती वाटते पृथ्वीच्या भविष्याची. फार धोक्यात आहे रे पृथ्वी."
 मानसी मंगळाला उद्देशून भावुकपणे बोलत होती.
 "भाषणबाजी बंद करून राणीसाहेबांनी लवकर रथस्थ व्हावे. आपले दोन तास संपले आहेत."
 असे म्हणून सौरभ यानात चढला. तेवढ्यात ठप्प झालेली यंत्रणा सुरू होऊन

पृथ्वीवरचे संदेश ऐकवू लागली. सौरभही संदेश देऊ लागला. यान सुरू झाले. त्या आवाजाने मानसी भानावर आली. आणि लगबगीने यानात चढू लागली. पण तिचा हात निसटला, न् भगीरथ वर उचलले.

१४ । सफर मंगळावरची