पान:सफर मंगळावरची.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाळ होणार आहे. तिला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. हे होणारे बाळ प्रत्येकाला पापापासून मुक्त करेल. तारेल. तो आपल्या सर्वांचा मुक्तिदाता होईल. त्यामुळे योसेफला आत्मविश्वास आला त्याने खेचरावर मारियाला बसवलं न् बेथलहेमला गेला. परंतू तेथे त्याला राहायला घर मिळाले नाही. म्हणून तो गोठ्यात राहू लागला. दिवस भरल्यानंतर मारियाला गोठ्यातच बाळ झाले. त्याचे नाव येशू ठेवले.
 एक मेंढरं राखणारा मेंढपाळ कुरणात मेंढरं चरायला घेऊन जायचा. रात्री तो तेथेच झोपायचा. येशूचा जन्म झाला त्या रात्री अचानक मोठा तारा त्याच्यासमोर आला व आकाशवाणी झाली, तुमच्यासाठी बेथेलहेममध्ये राजा जन्मला आहे. त्या दिशेने हा तारा पुढे पुढे जात राहिल. जिथे येशूचा जन्म झाला आहे तिथे थांबेल. ही खूण मिळाल्यानंतर मेंढपाळ धष्टपुष्ट कोकरं घेऊन त्या बाळाला भेटायला गेला.
 राजेलोकांपर्यंत ही वार्ता समजली. राजेलोकही बाळाला बघायला गेले. हा राजा कुठल्याही राजवाड्यात जन्मला नव्हता, तर तो एका गायीच्या गोठ्यात जन्मला होता. सर्व जमलेल्या लोकांनी गोठ्यात जाऊन बाळ व मारियाचे. यांचे दर्शन घेतले. राजेलोकांनी आपल्या जवळचे पैसे, सोने, उद, वगैरे दान केले. सर्वांनीच आपल्या ऐपतीप्रमाणे दान देऊन हा जन्म सोहळा आनंदानं साजरा केला. तेव्हापासून हा सण २५ डिसेंबर या दिवशी ख्रिश्चन लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. येशूने मोठा झाल्यावर खूप थोर कार्य केलं. त्याचा छळही झाला. तरीही येशू, 'सर्वांवर प्रेम करा.' असा संदेश देत राहिला. त्याला सुळावर खिळे ठोकून जीव मारणाऱ्या लोकांच्यासाठीही त्याने परमेश्वराजवळ प्रार्थना केली. तो म्हणाला, 'परमेश्वरा, ह्यांना क्षमा कर. त्यांना आपण काय करतोय तेच कळत नाही.' असा येशू सर्वांवर प्रेम करणारा. त्याच्या प्रेमसंदेशाने तो अजरामर झाला. म्हणून या साधूपुरूषाचा जन्मदिवस जगभर सणासारखा साजरा करतात. या सणाला दिवाळीसारखे कपडे, फराळाचं करतात. डोनट आणि केक करतात. बेथलहेमच्या परिसरात ख्रिसमस ट्री जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे हेच वृक्ष सजविण्याची प्रथा पडली.

 पूर्वी सांताक्लॉज नावाचा वृद्ध मनुष्य मुलांमाणसांत प्रेम वृद्धींगत व्हावं म्हणून, येशुबद्दल भक्तिभाव वाढावा म्हणून स्वत:च्या खर्चाने भेटवस्तू वाटायचा. सांताक्लॉजचे निधन झाल्यावर त्याच्या नावाने मुलांना भेटवस्तू देऊन खूश

सफर मंगळावरची । १२७