पान:सफर मंगळावरची.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्याची प्रथा पडली. एकमेकांवरचे प्रेम वृद्धिगंत व्हावे म्हणून असं करतात. असं म्हणून सांताक्लॉजने गोष्ट पूर्ण केली. मग रूक्मिणीने त्याला ताक कण्या आणि थोडं माडगं खायला दिलं. ते खाऊन सांताक्लॉज त्यांना आशीर्वाद देऊन निघाला. राही त्याला गाडीपर्यंत सोडायला गेली. तिला आणखी काहीतरी द्यावं असा विचार तो करत होता. गाडीजवळ आल्यावर त्याला गाडीच्या वरच्या बाजूला समोर लटकलेले झुंबर दिसले. त्याने ते काढून राहीला दिले. म्हणाला, "हे घरात लावा. तुमची भरभराट होईल. तुम्हाला अभ्यासाची, सतत कष्ट करण्याची, सगळ्यांवर प्रेम करण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही सुखी व्हाल. सुखी झाल्यावर जगाला प्रेमाचा संदेश द्यायला विसरू नका." असे म्हणून सांताक्लॉज निघून गेला.
 पुढे राही मन लावून शिकली. तिथल्याच शाळेत शिक्षिका झाली. तिने आपल्या विद्यार्थ्यांना, आजूबाजूच्या लोकांना नेहमीच प्रेमाची शिकवण दिली.

 मित्रांनो, काही शंका असल्यास फोन किंवा मेल करा, पत्र पाठवा.

१२८ । सफर मंगळावरची