पान:सफर मंगळावरची.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटू लागली. जरा आराम पडल्यामुळे तिची झोप लागली. रूक्मिणी झोपलेली बघून राहीला बरं वाटलं. तिनं थोडसं माडगं खाल्लं आणि घराजवळ लिंबाचं झालं होतं. तिथली जागा साफ करून एकटीच बसली गजगे खेळत. त्यावेळी तिला घोडागाडीतून सांताक्लॉज निघालेला दिसला. त्यालाही राही एकटीच खेळताना दिसली. त्याने गाडी थांबवली. गावात सगळ्या मुलांना भेटवस्तू वाटलेल्या. ते संपवून तो घरी निघालेला. राहीला पाहून थांबला. त्याने स्वत:ला खाण्यासाठी फळे ठेवलेली. ती राहीला दिली. तो म्हणाला,
 "मी गावात दरवर्षी येतो. तुला माहीत नाही का ?"
 "माहित्येय पण माझी आई आजारीय, म्हणून नाही आले. "
 " भेटवस्तू संपल्या की. आता तुला काय देऊ बेटा ?"
 "ही फळं मिळाली ना मला. आई आजारीय तिला पण होतील. तुम्ही माझ्या आईला भेटलात ना तर तिला बरं वाटेल. तिचं दुखणं पळून जाईल. "
 "तुझी आई आजारी असताना, तिला डावलून मी कसा जाईल. चल."
 मग सांताक्लॉज तिच्या घरी गेला घर छोटंच होतं. शेणानं सारवलेली जमीन उखणलेली होती. पाण्याच्या तुटवड्यामुळे अंथरूण पांघरूण मळलेले होते. कुबट वास घरभर पसरलेला होता. राहीने तिची छोटी वाकळ होती ती सांताक्लॉजला बसण्यासाठी जमिनीवर अंथरली. सांताक्लॉजला आधी मळमळले. थोडावेळ तसाच बसून राहिला. मग नाकाला सवय झाली, त्या

सफर मंगळावरची । १२५