पान:सफर मंगळावरची.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्यावर तो मालकाला म्हणाला,
 "मालक हे पैसे ठिवायचेत."
 त्याला वाटलं आता तरी मला पैसे बघायला मिळतील. मालक म्हणाले,
 “ठिवू की. माझ्याजवळ दे. मी उद्या जाणारेय तालुक्याला. येतो बँकेत ठिवून. "
 विठूला वाटलं, मालक कशावरून पैसे ठेवत्यालं. त्यांनी स्वत: लाच घेतलं तर... आपणच स्वतःच्या हाताने ठेवावेत. आधीचे पण बघता येतील.
 "मालक मला पण यायचंय." विठू लाजत म्हणाला.
 "तू कशाला येतोस. रोजगार बुडायचा न्हाय का?"
 "मला माझे पैसं बघायचेत."
 "बर जाऊ. पण अंघोळ कर न् चांगली धुवून कापडं घाल."
 मालकाने त्याला साबण दिला. मालक वैतागले. उगाच पिडा लागली मार्ग. हजार पाचशे रूपयं ह्याचं, न् लाखाची दौलत असल्यासारखा करतोय. ह्याला वाटतंय मी ढापतोय की काय ह्याचं पैसं ? ह्या गरीब वारकऱ्याचं पैसं घेऊन मी काय नरकाच्या वाऱ्या करू की काय खुळा कुठला.
 दुसऱ्या दिवशी विठूला घेऊन मालक बैलगाडीतून गेले. धान्याची पोती विकायला नेलेली. विठू बरोबर होता. त्यामुळे मालकाला हमाल लावायची गरज पडली नाही. सगळी पोती त्यानं आडत दुकानात नेली. वजन काट्यावर टाकली. नंतर त्याचे मिळालेले पैसे मालकानं बँकेत भरले. त्यांनी विठूचं पासबुक तयार झालं का विचारलं. पासबुक तयार झालेले. त्यावर रक्कम लिहिलेली. पण विठूला वाचता कुठं येतं होत ? मालकाच्या ओळखीचे एक अधिकारी होते. त्याला मालक म्हणाले,
 "त्याला तेवढी रक्कम दाखवा मजी त्याचा जीव थंडगार होईल. लय डोकं खातुया".
कॅशियरने त्याला दोन हजाराच्या नोटा दाखविल्या. ते म्हणाले,
 "हे बघ तुझे पैसे. "
 विठून नोटा हिसकावूनच घेतल्या. त्याला ते डब्यातले दोऱ्यात बांधलेला बंडल असेल असं वाटलं. ह्या करकरीत नोटा आपल्या कशा? हे आपले पैसे नाहीत. त्याने त्या नोटा कॅशियरकडे फेकल्या. आणि म्हणाला,
 "हे पैसं माझं न्हाइत."

 असं म्हणत हमसून रडू लागला. त्याला वाटले मालक आणि ह्या लोकांनी

११६