पान:सफर मंगळावरची.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असा मी... तसे ते.../५ एकदा माझी दाढ फारच दुखायला लागली. आता आईकडं गेलं की ती खवळणारच. म्हणणार, गोळ्या, चॉकलेट खायला पाहिजेत. दात दोन वेळा घासायला नको, चला आता डॉक्टरचा खिसा भरायला. डॉक्टरकडे गेले की ते तोंड वासायला सांगतील. माझ्या तोंडात स्वतःचा हात घालून... ओ ऽ ऽ ओ s ते आठवून ओकारी यायला लागली. वर आणखी सांगणार, ह्या गोळ्या घ्या, ह्य औषधाने चार वेळा गुळणा करा. बरं वाटलं नाही तर परत या. दाढ काढून टाकू. म्हटलं त्यापेक्षा सुरक्षाचक्राच्या पेस्टनं दाढ चांगली घासून काढावी. हिरडी काय म्हणेल याची वाट न बघता जोराजोरात दात घासले. थोडसं रक्त आलं पण ठणका काही राहिना. मग भीतभीतच आईला सांगितलं. आता आईनं भलं मोठं भाषण दिलं तरी ऐकून घ्यावंच लागेल. तर आईनं स्वत: तोंड मिटून मलाच उघडायला सांगितले. 'आSS' करून तिच्यासमोर उभा राहिलो. हळूच तिच्या हातात चिमटा आहे का बघितलं. काय सांगावं पर्स रिकामी होईल म्हणून घरातच दाढ काढायची. त्या नादात माझा आ मिटला. मग ओरडली. अरे, हलू नकोस मग पुन्हा पुतळ्यासारखा आऽऽ करून उभा. तर म्हणाली, मिट. आता काय करावं. मी आपला असा SS दाढ धरून आत बाहेर करत होतो. खरच आईनं चिमट्यानं दाढ काढली तर बरं होईल, असच वाटायला लागलं. पण आई तर मिक्सरवर काहीतरी दळायला लागली. बहुतेक लवकर स्वयंपाक करून दवाखान्यात न्यायचा विचार दिसतोय. मला ती दातांच्या दवाखान्यातली मोठी खुर्ची आठवली. तसलीच