पान:सफर मंगळावरची.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा मी.... तसे ते .../४


 सुट्टीत मावशीकडे गेल्यावर तर काय विचारायलाच नको. मावशीच्या अन् आईच्या गप्पा कधीच संपणार नाहीत. त्या गप्पा जर एकसारख्या आठवडाभर लिहून घेतल्या तर, महाभारताचे आठ खंडाएवढे लिखाण होईल. काय एवढं बोलतात त्यांनाच माहीत. मला मात्र मावशी गोड गोड बोलून अनुजाला खेळव म्हणून सांगते. तर आई दरडावून, ये खेळव ना जरा आम्ही पोरांसाठी किती खस्ता खातो अन् आमच्यासाठी थोडा वेळ छोट्या भावंडांना खेळवता येत नाही. मुकाट्याने अनुजाला घेऊन बाहेर जातो. तर तिचे पन्नास प्रश्न. नुसता वैताग. मलाच कधी उत्तरं मिळालेली नसतात. तर मी तिला काय सांगू? मग मी पण आईबाबांसारखा अनुजावर खेकसलो. 'ये गप्प बस नाहीतर एक धपाटा घालीन.' असं नुसतं म्हटलं तरी अनुजाचं भोकाड सुरू झालं. आईनं मला रागवावं अन् मावशीनं अनुजाला कडेवर घेऊन, 'काय झालं माझ्या शोन्याला. दादानं मारलं ? आपण दादाचं घर उन्हात बांधू हं. उगी उगी.' तसं शोन्याचा हूँ ऽऽ हूँ ऽ वाढतच चाललेला. अस्सा राग येतो. एवढा

सफर मंगळावरची । १९