Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

il = कांहीं वाटणी मिळेल झणून लाळ घोगत आहेत त्यांचे तोंडाला चांगली पाने पुसावी, त्यास कोणत्याहि तऱ्हेनें त्या मुलखाला स्पर्श करू देऊ नये, हल्लींचे घालमेलीत अमराचा खरोखरच गुन्हा आहे की काय याचा चांगला तपास करून त्या प्रमाणेच त्यास शासन मिळावें. उगाच पडन्याचें तेल वांग्यावर काढणेंहि न्याय हेणार नाहीं. हल्ली काबुलांतील जे लोक आमचे सरकारचे सैन्यास कोणत्याहि तम्हेनें अडथळा करीत नाहींत त्यांस आमचे लष्करी अंमलदार शत्रु समजत नाहीं हें खास अनुसरूनच आहे पणत्यांस शत्रु मानले नाहीत तथापि ते शत्रु रुडील आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे आमचे लष्करी कामदार यालढाईत आपल्यास जय मिळेल अशो भरवशांत आहेत व तसे आह्मासाह वाटते, तथापि काबुलचे लोकांचा दोन सभाळून असणे रास्त आहे आतां या कामात कित्येक आपल्या नुका दुरुस्त करतील, कित्येकांस त्यांच्या चुकीचे प्रायश्चित भोगावें लागेल, हजारों लोके वकवां सारखे मरून जातील, कित्येक लोक जयसंपाहून बहादुरी आणि इनामें मिळवितील, कित्येकांस आपल्या चुकीचा पश्चात्ताप वाटेल, पकांही मौज पाहून नरोवा कुंजरोग झणतील, आणि कित्येक या घालमेलीतीर बन्याबाईट गोष्टींची निवड करतील. हें सगळं खरें. पण या एकंदरचुकीने विश्वासाने आमच्या सरकार चा कालांतील यकील व त्याची अनुयाची मंडळी जी आकाशांतील बापा कडे गेली आहे ती मात्र परत येगार नाहीं. तेव्हां त्यांच्या मागें त्यांच्या मुलामाणसांचे योग्य संगोपन करणे होहे सरकारचें एक कर्तव्य होय असे कोणीहि अणेल.