Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५ आतां या लढाईचीं जो वर्तमानें येतात ती फारच चमत्कारिक असतात. झणजे त्यांत कांहींच मेळ नसतो. हा सर्व बंडाण रयतेचा असून तिणे अमीराला देखील कैदेत घातले आहे हे प्रसिद्ध झालेच आहे, पण त्याबरोबर हीहि दाट बातमी येऊन ठेपली व अद्यापार्ह येते कीं, अमीर इंग्लिशाना वारंगर लिहून कळावतो की, या कामी माझा अगदी निरुपाय आहे, ल.के मानें एकत नाहीत, व स्वतःमजवर भयंकर प्रसंग येऊन गुजरला आहे. सर्वात या बातमीच्या विरुद्धतेचें आह्मास फार आश्चर्य वाटते. कानुलाची रयत इंग्रजांविरुद्ध उठली असून तिजे 'अमीराला जर कैदेत घातला आहे, तर त्या अमीराचा आणि इंग्रजसर- कारचा पत्रव्यवहार होण्यास अमीरास मोकळी कशी मिळाली? तशांन हा पत्रव्यवहार बिथरलेल्या रयतेच्या कांहीं हिताचा असता तर तसे नाहीं संभवते, पण तो उलट अमीराला अनुकूल असून लोकांचे अगदी विरुद्ध आहे. याजवरून असे अनुमान होते की, अमरि स्वतः या बंडांत आहे व त्याच्याच सल्याने ही सर्व धामधूम मातली आहे. आतां ही लढाई उपस्थित होण्यास कारणी कोण व कोणाचे सुकने हा प्रसंग आला याचा विचार करूं. हा विचार करू लागले ह्मणजे या काभ अमचे सरकारचाच दिलेग्णा, शत्रूवर गजबी पक्षां फाजील विश्वास, मनुष्याची परीक्षा करण्याचे काम अप्रयोजकता, आणि स्वत:चे बळाची आणि वैभवाची घमंड हीच या प्रसंगाची पुरूष वारणें होत असें ह्मणावें लागतें. कारण, ज्या वेळी अमीराशी तह केला ते वेळी तेथील पुष्कळ लो क त्या तहनाप्यास कबल नव्हते असे मार्गे प्रसिद्ध झालेलेच आहे. आ तां अमीराशी केलेले तहास त्याची रयत अनुकूल नसलो ह्मणून काय हर कत आहे असे कदाचित कोणी ह्मणेल, परंतु बाह्मणण्यात काही अर्थ नाहीं. आणि त्यांत अर्थ नाहीं हें ही प्रत्ययासहि आले आहे. राजा या नात्याने आमचे सरकाश वरावर तहनामा करण्यास जरी अमीराला अधिकार होता, तथापि अमीराचा अमीरणा उडवून दिला झणजे त्या