Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काबूलच्या लढाईचें पुनरुज्जीवन.. चें मागें इंग्रज सरकार आणि काबूलचे अमीर यांजमध्ये मातवर लढाई होऊन नंतर त्या उभयतांत तह झालेला सर्वांस माहित आहेच. यालढाई मूळ कारण फार महत्वाचें नवतें तथापि त्याचा परिणाम मोठा मयंकर होऊन अमीर आपले स्वतंत्रतेस आंचवला आणि त्यास इंग्रजसरकार झणेल तसा तह लिहून द्यावा लागला. रशियानें आपका वकील काबूलांत पाठवला त्यास अमीराने आश्रय देऊन त्याचा चांगला आदरसत्कार के ला, आणि इंग्रजांचे वकीलास त्याण हांकून लाविले हे या लढाईचें मूळ कारण. इंग्रज सरकारास आपले वकीलाचा अमोराने अपमान केला तो सहन न होऊन यांणीं अमीरास असे कळलें कीं, राशयाचे वकीलास आपले राज्यांत न राहू देतां आमचा वकील मात्र काबूलांत राहील त्या स राहू द्याषा, आणि असें न होईल तर लढाईस तयार व्हायें. अमीराला रशियाचा भरंवसा होता, आणि त्याचे जोरावर तो इंग्रज सरकाराबरोबर लढाई करण्याम तयार झाला. नंतर उभयतांची लढाई सुरू झाली, पण रशियाने काबुळवारपाला तोंडघशी दिले. त्या लढाईचा परिणाम कसा झाला दें पर सांगितले आहे. असो, अमीर आपला अंकीत झाला असे समजून इंग्रज सरकारने त्यांचे हद्दींत आपला एक वकील आणि त्या वकाला बराबर पांच पन्नास लोक ठेऊन रेसिडें- नसीचें ठाणें बसविलें. अमीरानें जो तह केला त्याजबद्दल काबूलचे लोकफार कुरकुरतच होते. अगोदर मुसलमानी धर्माचे लोक झटले झणजे मोठे अभिमानी आणि हूड असतात. तशांतून ज्या काबूलचे लोकांस दुसन्याचा ताबा माहीत नव्हता ते परधर्मी ह्मणजे ख्रिस्ती राष्ट्राचे अंकीत झाले. तेव्हां तर त्यांस जास्तव वाईट वाटलें मुसलमानी धर्मात्रांतून अन्यधर्मी जेवढे लोक पढे सगळे काफर असे त्यांचे मत आहे, आणि या लोकांची