पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ वितांना जर त्या व्यक्ती दोपहोन आहेत व्यसे वाटते तर त्या काळाच्या सर्व लोकांसहि आझी सदाचरणी समजून त्या युगांची व त्यांतील लोकांची मनापासून तारीफ केली असती, आणि त्यामुळे प्रस्तुत युगा विषयों में पुरातन कवींनी मत लिहून ठेविलें आहे ते मान्य केले असते. पण हल्लीं च्या लोकां प्रमाणेच त्या वेळच्या लोकांत सदाचरण आणि दुराचार दृष्टीस पडत होतें, पापो आणि पुण्यवान, सद्गुणो आणि दुर्गुणो, आस्तिक आणि नास्तिक, स्तुत्य आणि निंदाई असे दोनही प्रकारचे लोक जसे हल्लीं आहेत त्याच प्रमाणे पूर्व युगांताहे होते. याजवरून या कलियुगास पूर्व युगां पेक्षां कोणत्याहि तऱ्हेनें निंद्य मानतां येत नाही. तशांतून परमार्थ संबंधानें तर प्रस्तुत युग में विशेष सोयीचार वस्तुय आहे. आतां ऐहिक संबंधानें या युगांतील झणजे प्रस्तुत कालचे लोकांची स्थिती कशी आहे याचा विचार करावयाचा. परंतु आज स्थलसंकोचास्तव तसे करतां येत नाहीं. ज्या प्रमाणे पारमार्थिक संबंधाने पर साम्य दर्शविले त्याप्रमाणे ऐडिक संबंधाने प्रस्तुतचे युगांत व पूर्व युगांत जमीन व्यस्मानाचे अंतर दिसते व ते दिवसे दिवस जास्त वाढत आहे. या संबंधे सविस्तर विवेचन करण्याचें झटले झणजे हा स्वतंत्र निबंध लिहिला पाहिजे असून आज तसे करण्यास सवड नाहीं, याकरितां पुढील खेपेस " ऐहिक संबंधाने प्रस्तुत काळचे लोकांची स्थिती" या सदरा खाली आह्मी या संबंधाचे विचार सादर करण्याचे कबूल करून प्रकृत विवेचन पुरे करितो. G