Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ सर्वज्ञ पुरुष राज्यलोभाला गुंतून आपले कर्तव्य विसरेल असे समजणें हाच वेडेपणा आहे. रामानें बनवासाला जाऊन जी कृों केली ती त्यास लढाईला झणून जाऊनदि करता आली असती. आतां इतकें मात्र खरें की बायकोचे नादानें दशरथानें जितकें निंद्य काम केले, त्या मानानें रामाचें आचरण फार स्तुत्य होय. त्याणें पितृभक्तीची सोमा केली. येवढचा सार्वभौम पदावर लाथ मारून ते आपल्या कनिष्ठ बंधूला देण्या विषयी मोठचा आनंदानें कबूल करणारा, व स्वतः वनवास भोगण्या विषयीं उद्युक्त होऊन जटा यल्कलें धारण करणारा पुत्र फार धन्य होय. अशी पितृ भक्तो विरळाच दृष्टीस पडेल. त्याच प्रमाणे सीतेचें पातिव्रत्य आणि लक्ष्मण मरतादिकांची म्रातृ भक्ती द्वि अवर्णनीय होय. असो, यांत प्रकृत विषयाचे संबंधानें इत- केंच पदावधाचें कीं, दशरयानें स्त्रीजित पणाची सीमा केली. तेव्हां हें त्यावेळच्या प्रत्यक्ष राजाचें आचरण !! बालीने प्रत्यक्ष आपल्या भावाची बायको जत्रीने आपले जवळ ठेऊन तिच्याशी संभोग केला, हें करणें किती निंद्य आहे? असला प्रकार कलियुगांत कोठें झालेला प्रसिद्ध नाहीं. या गोष्टी त्रेतायुगांतल्या. द्वापर युगांतहि असे अनेक प्रकार होते. कंस व त्याची अनुयायी मंडळी यांचा माय किती दुष्ट होता ? ज्यांणी कृष्ण हा ईश्वरी आवतार आहे असें माहित असतांहि त्याचा किती छळ केला? ब्रह्महत्या व बाला हीं पातकें ज्यांच्या खिसगणतीत नव्हती. जरा संध, कीचक शुशुपाल वगैरे राजे कीती अनीति संपन्न आणि होते? साध्वी द्रौपदीचा कीचकानें किती छळ केला? पण त्या भेकड विराटाच्यानें त्यास प्रतिबंध करवला नाही. तसेच दुर्योधनादिक. जुगार खेळण्याचे ही शी, धनार्जना विषयी प्रत्यक्ष भाषा बंधांना ठार मारण्या पर्यंत व जिवंत जाळून टाकण्या पर्यंत तपार, परस्त्रियां विषयीं अभिलाषी, साध्वी स्त्रियां ची विटंबना करण्या विषयी तयार, आणि सत्यासत्याचा विचार ज्यांच्या मी नाही, असी त्यांची स्थिती होती. धर्मराजाची स्त्री द्रौपदी जिला माते प्रमाणे मानावयाची तिचा भरसमेत अपमान करून तिला नम