पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहिजेत नाहीं पेक्षां त्या ज्ञानसंकीर्तना पासून खरा उपयोग होणार नाहीं. अग्नीची क्रिया झटली झणजे कोणत्याहि पदार्थाला स्पर्श होतांच जाळून टाकणें ही होय, तद्वत हरिनामानें पातकांचा नाश होत असल्या मुळे तें कसें जरी झटलें तरी सारखेच असे कित्येकांचें ह्मणणे आहे. कारण यामनांनीं नामसुर्वेत झंटले आहे- न कळतां पद अग्निवरी पडे । न करि दाह असें न कधी घडे ॥ अजित नाम वदो मलखा मिसें । सकळ पातक भस्म करीतसे ॥ तेव्हां याजवरून भगवन्नाम गृहणास ज्ञानादिकांची गरज काय असा प्रश्न उत्पन्न होतो, पण तो यथार्थ नाहीं. या संबंधानें आह्मी एक गोष्ट ऐकलेली स्मरते, ती या ठिकाणी सांगितली असतां अप्रासंगिक होणार नाहीं असें जाणून सांगतों. का शिक्षेत्रामध्यें येक तरुण व रूपसंपन्न वेश्या राहात असे. तिच्याच शेजारी एक ज्ञानी विरागी पुरुष अल्पवयांतच चतुर्थाश्रम धारण करून मठांत राहात असे. गंगेवर जाण्याचा मार्ग या वेश्येचे दारावरून असल्या मुलें तो संन्याशी सुप्रभात नेहमी स्नॉस जात असे. दिवस थंडीचे असून हा विरागी पुरुष असा उघडा बोडका कुडकुडत सकाळचे प्रहरी थंड पाण्यांत निस स्नान कां करितो याचे इंगित तिला कळेना. खरे आहे, शाल जोडीचा बुरखा मारून प्रहरदिवस येई पर्यंत खुशाल छप्पर पलंगावर निजून राहणारी वेश्या तिला ही तापसी वृत्ती कशानें कळणार? आसो तिणें असा निश्चय केला की, या संन्याशास या दुःखकारक स्थितींतून काढून विषय सुखाचें महत्व व्यास प्रकट करून कांहीं दिवस आपले संगतीस ठेवावा. ती वेश्या मोठी चतुर होती. दुसरे दिवशीं तिणें सकाळीच उठून त्या संन्यासी बोषांचा रस्ता आडवून धरला. निन्या प्रमाणे संन्यासी तिचे •