पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९ लेल्या सर्व स्थावर जंगम मालमत्तेचा मालक आपल्या मागे आपला पुत्र होईल असे त्यास माहीत असतां, य तो पुत्र आपल्या दुनाने सर्व मालमत्तेची राख रांगोळी करील असी त्याची खात्री असतांहि झातारा अन्यायानें आणि अनतीनें धन संपादन करून ते दानादियांत किंवा उपभोगात न घालवितां सांचपून ठेवितो, तो मनुष्य संसारास पासलेला, दगदगलेला, य हरयेक गोष्टी विषयों ज्यास तिरस्कार उत्पन्न झाला आहे असा दिसतो, पण धनार्जनादिकांविषयी त्याची इच्छा विशेष आगरूक असते. आणि मरण लवकर प्राप्त होईल या भीतीनें सो फारच उतावळा होतो, मनुष्यास संसोराविषयी तिरस्कार उत्पन्न होत असून त्या विष- पींची त्याची आसक्ती कमी होत नाहीं, त्यामुळे पारमार्थिक विचार करण्याची त्यास इच्छा होत नाहीं अणून वर सांगितलें, याचें कारण इतकेंच की, तो या संसाराची अशाश्वता ऐकतो व पहातो तथापि सी श्याचे चित्ताला अनुमत नसते. त्याच्या अंतःकरणावर संसाराचे अशा वतेचा चांगला ठसा उठला पाहिजे. पण असे होण्याला प्रथम चित्त शुध्धी व्हावी लागते. चित्तशुद्धी होग्याच्या मुख्य गोष्टी अशा आहेत की, सर्वत्र परमेश्वराचें आपलोकन, स्तुति, महापूजा, नमस्कार, स्मरण, आणि प्राणिमात्राचे ठायीं ईश्वराची व्यापकता आहे अशी बुद्धी असली पाहिजे. या खेरीज दुष्ट संगतीचा स्याग, सत्यभाषण, गुरुजनांचा बहुमान, दुःखितां विषयीं दया, स्वसमानांचे ठायीं मैत्रां, प्राणायामादिक योगेशास्त्रांतर्गत कृत्यांचा अभ्यास, श्रुतींचे शिरोभाग जीं उपनिषदें त्यांतील तत्वमस्यादि वाक्यांचें गुरूपासून श्रपण, परमेश्वराच्या नामाचें संकीर्तन, साधूंचा समागम, सरळपणा, अहंकाराचा त्याग, आणि सार्व काळ परमेश्वराच्या पूजादिकांची इच्छा येणे करून अंत:करणाची शुद्धी होते. अशा रीतीनें शुध्धचित्त होत्साता मनुष्य या संसारांत वागू व्यगा झणजे त्याचे ऐहिक पाश स्वाभावीक तुटत जातात. तो जरी .