पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ य यसे मसते तर सगळी दुनिया इंद्रियनियमन करून मुक्त झाली असती. पण असे कुठे आहे ? हजारों वर्षे लोहपिष्ट खाऊन तपश्चर्या करावी तरी इंद्रियें स्वाधीन राहत नाहींत. संसाराची विरक्तता अंतःकरणांत केव्हां केव्हां जरी उत्पन्न होते, तथापि ती एखादे मानीय सुखांत कांहों कमीपणा किया उणीव झाल्याने येते, पण त्यापासून त्या पदार्थाचा तिर- स्कार न करितां किंवा त्यापासून अलित न राहता आपणास सुखकारक होई अशा त-हेचा तो पदार्थ बनविण्याची किंवा त्याचे ऐवजी दुसरा मिळविण्याची मनुष्यास उमेद येते. यामुळे तो अधिकाधिक गुंतला जाऊन अधीक पस्तयांत पडतो, असे समजा, की एखादे मनुष्याचें घर लहान असून त्याची दारें ठेंगणी आहेत. दाराला डोके लागेल या भीतीनें तो मनुष्य जाणून व बांकून वागतो. पण अनेक व्यवहारिक उपाधीनी आणि लगबगीनें त्या दाराची ठोकर लागून डोक्याला जखम पडली, की त्या घराचा तिरस्कार उत्पन्न होऊन लगेच तें मोडल्यायांचन जेवायचे नाही अशा हटानें मजूर बोलवून तें पाडण्याची सुरवात बरें घरावरील रागानें यात्री घराविषयींची आसकी कमी होते काय?उलट नयी सातरवणी बांधण्याचे यातातीत पडण्याचे तयारीस तो लागतो, याचप्रमाणे स्त्रीपुत्रादिक. स्त्री मनाजोगी किंवा अनुकूल नसली झणजे मनुष्यास त्रास येतो पुत्र दुराचारी व मूर्ख असला झणजे मनुष्य या संसारास कंटाळलासा दिसतो, मित्राने विश्वासघात केला अणजे यास मोठा तिरस्कार उत्पन्न होऊन या व्यवहारिक मावेस तो कंटाळतो, पण या कंटाळण्यानें संसार पासून त्यास पराङ्मुख होतां येत नाहीं, याचे कारण इतकेंच कीं, तो वरील उपाधींच्या संगतीस भासत नसून त्यापासून त्यास जें कांहीं अपे- क्षित सुख मिळावें झणून त्याची इच्छा असते तें न मिळाल्याने किंवा ज्या गोष्टीस तो दुःख समजतो त्याची प्राप्ती प्रकृत उपाधी पासून होऊं लागल्यानें तो कंटाळतो, पुत्र मूर्ख व दुराचारी निघाला तथापि स्याच्या यध्व पित्याची संसारा विषयीं आसकी कमी होत नाहीं, आपण मिळावे 9