पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशांतील कोळी, मुसलमान, चांभार, रामोशी व कातवडी या राजभक्त जातीतील लोक नेमून दिले झणजे सर्व राज्याचा कारभार कसा सुरळीत चालेल याची कल्पना करण्याचे काम वाचकांवरच सोपवि पण अशी व्यवस्था केव्हा होईल असा एक प्रश्न उत्पन्न होतो. आमच्या मतें जेव्हां शेवटल्या रावबाजी सारवें राजरत्न गादीवर विराजमान होतें तेव्हांच अशी गंमत उडते. प्रस्तुतच्या इंग्रज सरकारच्या दक्षतेच्या कारभारांत अशी बजबजपुरी होण्याचा फारसा संभव नाहीं. तथापि सरकारच्या जातीचेच लोक या ब्रह्मद्वेषास कारणी होऊन विनाकारण ओरड करीत आहेत, आतां सरकार जरी तसल्या लोकांच्या वेडगळ व निंद्य मतास अनुसरून वागत नाहीं, तथापि त्यांची मते कान देऊन ऐकू लागले आहे व त्याच्या खरे खोटे पणाच्या भ्रांतीत पडून ब्रह्मण लोकां विषयों केव्हां केव्हां शंकित झाल्या सारखे दाखवित ह्मणून थोड़ें वाईट वाटते. आता हा प्रकार तरी खुद्द आमची राजकर्ती किंवा तिला सल्ला मसलत देणारे पार्लमेंटाचे सभासद यां पैकी कोणाकडून घडलेला नसून या देशांतील कित्येक्त युरोपियन अधिकारी व तद्देशीय व्यभिचारी लोक यांचे असे उद्गार निघतात. तेव्हां याचा विचार तद्देशीय ब्रह्म जांनीं (या देशांतील युरोपियन विद्वानांनी) अवश्य केला पाहिजे. आतां प्रस्तुत निषेधांत विद्वान ते ब्राह्मण असें जें श्राह्मी साधारण मत दियें आहे त्याजवरून कित्येकांस असें वाटेल की, युरोपियन लोकांतील विद्वान गृहस्थांस जर ब्राह्मण झाले तर हिंदु ब्राह्मणांनी त्यांचे पंक्तोस बसून सांपाशी शरीरसंबंबहि केले पाहिजेत. पण अता प्रकार मुकधीं घडत नाहीं व घडण्याचा संभवाह नाहीं. हा प्रकार तर असो, पण या देशांतील ब्राह्मण लोक जर त्यांचा स्पर्श झाला तर विटाळ मानून खान करितात. तेव्हा त्यांस उगाव ब्राह्मणवणा देण्यांत कांही अर्थ नाहीं. असें प्रथम मनांत येतें खरें, पण त्या ह्मणण्यात कांडीं अर्थ नाहीं. हा प्रकार आमच्या देशांताद आहे. झणजे अवच्या देशांतील ब्राह्मण लोकांतच असे .