Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ बड़ा बेटा” असा प्रकार सर्वांना अनुभूत आहे. तेव्हांवरील नात्याने याचे उलट वागण्याचा प्रसंग येईल, इतकेच नव्हे, पण तसी वर्ण व्यवस्था कराण्याची झटली ह्मणने राजपुत्राचे आंगीं राज्य पालविण्याची योग्यता असल्या बांधून त्यास गादीवर बसवितां येणार नाहीं. पण वैभवानें धुंद झालेल्या व पुत्र मोहानें बेडाळलेल्या किती राजे लोकांस बरें ही पसंत पडेल? आमच्या मतें अमा सत्याचा निःसीम भक्त जथे उत्पन्न होईल तो खरोखर पुण्यभूमि होय. अस्तु, मिळून तात्पर्य काय की. अशाच योगानें पर्वोक्त वर्णव्यवस्था ढांसळली.. आणि शेवटीं देशपरत्वें, आचार परखें, आणि धर्माभिमान परवें, लोकांमध्ये अनेक जाती व त्यांचे पोटभेद उत्पन्न होऊन सर्वच गोंधळ झाला. व त्या योगानें कलह बाटून लोक पराधीन, दरिद्री व दीर्घद्वेषी झाले, हा प्रकार आमच्या देशांत फारच बळावला. आमच्या देशांत या चार वणी पैकी प्रत्येक वर्णत श्रेष्ठ कनिष्टपणा मानून लोक एकमेकांचा हेवा करतात. अस्तु. प्रकृत विवेचनावरून ब्राह्मण कोणास ह्मणावें हें वाचकांचे लक्षांत आलेच असेल. आतां याजवर कित्येक लोकांस अशी शंका येईल की, पूर्वोक्त गुणांनी युक्त मनुष्य नसेल तर त्यास त्याच्या वर्णाप्रमाणे मान मिळू नये असे याजवरून सिद्ध होते. पण ही चक आहे. चूक आहे. शंभर नंबरी सोने असले तरच त्यास सुवर्ण ह्मणतात. आणि त्यापेक्षां निरस असेल त्यास ताबें ह्मणतात असा प्रकार व्यवहारांत कधीं कोणी पाहिला आहे काय ? सुवर्ण निरस झाले तथापि उत्तम चांदीच्या दरानें देखील मिळणार नाहीं, मग त्याहून कनिष्ट धातूंशीं तर त्याची बरोबरच करावयास नको. मनुष्य कांही सर्वगुणसंपन्न नाहीं. याकरितां ज्याची जशी योग्यता असेल तद्वत त्यास मान देणें हें रास्त आहे. येथे लक्षात ठेवले पाहिजे की, साखरलिवाचे बीजा पासन तज्जातीय झाड उत्पन्न होगें जितकें संभव नीय व सुभ आहे तितकें इडीला मालमसाला घालून होणार नाहीं.