पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९, हाच प्रकार जाती संबंधानें श्राच्या विरुद्ध कधी कधी एखादें उदाहरण मिळते पण त्यास "तुळशींत भांग किंवा मांगेंत तुळस " असें ह्मणण्याचा परिपाठ आहे. अलीकडे ब्राह्मण लोक स्वधर्म भ्रष्ट, तेजहीन, निर्बल, व दुराचारी झाले असें बहुत लोकांचें ह्मणणे आहे पण तें अज्ञान मूलक होय. अतां कदाचित या मानानें तसे तेजस्वी व विद्वान तितके लोक सां प्रत नसतील, तथापि यास अनेक कारणे आहेत, व खेरीज हा प्रकार कालमहिम्याचाहि आहे. याकरितां उगाच ब्राह्मणांचा द्वेष करणे व त्यांस दूषण देगें हें सर्वया अयोग्य होय. 19 व अलीकडे आमच्या इंग्रज सरकारचे बड़े अधिकान्यांनी व त्यांचे सजा तीयांनी या देशांतील ब्राह्मणांवर बरेंच हातेरे घरलें आहे. ब्राह्मणांचा यांस दिवसेंदिवस जास्त कंटाळा येत चालला आहे, त्यांजवर अलीक.. डे राजद्रोहाचा वृथा आरोप आणून कित्येक मूर्ख विनाकारण यांस दूषण देत आहेत. नीव जातीच्या लोकांस शिक्षण देऊन त्यांस मोठाल्या जागा व अधिकार देण्याची सरकारचे अधिकान्यांस होस वाटते. हा प्रकार सत्ता बन सालापासून वाढत चालला आहे, आणि याचे कारण पाहू लागले असतां सत्ताग्न सालचें बंड. नानासाहेब हा ब्राह्मण असून त्या इंग्रज सरकारच्या विरुद्ध बंड केले व सरकारला त्रास दिला हा प्रस्तुतच्या त्र ह्मद्वेषाचा मुळ पाया, तेव्हांगसून हा प्रकार वाढत जाऊन प्रस्तुतच्या फड • क्याचे धामधुमी पासून व पुण्याचे जुनाट वाड्यांस आग लाविल्या पासून तर हा ब्रह्मद्वेष बहुतेक शिखरास लागत आला आहे. या फडक्या ने लुटालूट करून रयतेला तर पुष्कळच नागविली, पण याहीपेक्षा त्या ब्राह्मणाचे मार्गे चांगलेच सुदर्शन लावून दिलें, ब्राह्मणांनी बंड के किंवा सरकारावर शस्त्र उचललें यामुळे ब्राह्मण जाती राजद्रोही झाली असे ज्यां स घाटते व ते तसें ह्मणतात, त्यांस ब्राह्मण झणजे काय हेच समजत ना हीं असे आह्मी ह्मणतों. कारण, नानासाहेब व फडक्यादिक हे जरी ब्राह्म णांमध्यें व ब्राह्मणापासून उत्पन्न झाले आहेत, तथापि ते गुणकर्मावरून