पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

० दांता. असा, तें कसेंहि असले तथापि पुत्र व्हावा ही इच्छा विशेषतः बहुतेकांचे ठिकाणी असून बाललीला ही साधारण सर्वसहि प्रीय होयः आतां जें उत्पन्न झाले तें लयास जाणार असा सिद्धांत असल्यामुळे आईबापांचा पुत्रही मृत्यूचा अधिकारी व्हावयाचा असतो. प्रत्येक दिव शीं त्याचें आयुष्य क्षण होत असतें. घटका, दिवस, महिना, वर्ष, दहा वर्षे असा अयुष्याचा काळ कमी होत असतो. मनुष्याचें जीवित मान साधारण १०० वर्षे किंवा अलीकडील लोकस्थितीचे मानाने ६० । ७० वर्षे होय. तेव्हां मूल उत्पन्न होऊन महिन्याचें झाले झणजे त्याच्या - आयुष्याचा महिना कमी होतो ही गोष्ट वास्तविक मोठ्या दुःखाची होय. पण लौकिकाचार याच्या अगदी उलट आहे. जसजसे मूल वाढत जाते तसतसा त्याच्या आईबापांस व पालकांस मोडा आनंद होतो व तन्निमित्त यथाशक्ति ती मोठा उत्साह करतात. पुढें तो तारुण्यांत येऊन संसार पाहूं लागला ह्मणने हा काल तर आनंदाचा कळस आहे असी समजूत असते. पण जशी जशी रात्र जास्त होत जाते तसां तसा नाटकाचा भाग आटपत येतो. तद्वतच मनुष्याचें जीवित आहे. याच्या निरनिराळ्या आवस्या त्यास वेगवेगळ्या स्थितीत नेतात. उपज ल्यापासून तो मृत्यूचे भयंकर जबड्यांत पडे पर्यंत त्याचे सर्व व्यापार संसार संबंधी असतात. यामुळे त्यास मृत्यूचें स्वरूप आहे काय? या जन्ममरणाचे फेरे चुकतील कशानें? हे फेरे घालवणारा मृत्यूचा शास्ता कोणी आहे की नाहीं? तो भेटेल कसा? इत्यादि पारमार्थिक विचार करण्याचीच त्याला फुरसत होत नाहीं. त्याच्या अयुष्याची जशी काय संसाराकडे वांटणीच करून दिली असते:- - बालपनों में खेल बताया। तारुनपनमों काम ॥ युद्ढेपनमों कांवन लागा | निकल गये अवसान || अवतुम कब सुमरोगे राम ||