पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तपोनिष्ट, व्यास वाल्मीका सारखे त्रिकालज, इंद्रायमरां सारखे चिरंजोय, आणि प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णु महेशासारखे परमेश्वरांशी यांच्या मागेंही उत्पत्ति स्थिति, आणि लप याचा फेरा आहे. ज्यांनी आपणास महान साधु ह्मणवून घेतलें, जे स्वधर्मरक्षक ह्मणून जबांत प्रसिद्धीस आले, ज्यांणी आपणास देवाचे पुत्र असे झणवून लोकांत दांडोरा पिटला, जे जुने सम के धर्म मोडून नया एक धर्म स्थापित करण्याकरितां ह्मणून ईश्वराची आज्ञा घेऊन आलों असे सांगून लोकांमध्ये रक्तपात व द्वेष यांची समृद्धी करण्यास कारण झाले, ब जे व्अनेक मतांचे आणि पंथांचे उत्पादक व गुरु ह्मणवून घेऊन शिष्यवर्ग गोळा करून जगाचे तारक बनले, त्या सर्वांना मृत्यूने आपले दरबारांत नेण्यास सोडलें नाहीं. मृत्यूचे दरबारचें बळावणे टाळण्यास आजपर्यंत कोणीहि समर्थ झाला नाही व पुढे होणार नाहीं हा सिद्धांत आहे. यरील सर्व बहादरांस मृत्यूनें पटापट गोळा करून नेले. आणि त्यांना न जाऊन परिणामही नाहीं. कारण - पीर मरे वैगंबर महगये मरगये जिंदा जोगी | जपी तपी संन्यासी मरगये मरगये हकीम रोगी ॥ जमका अजब तडाकावे ॥ तूं क्या जाने लडका बे ॥ ध्रु ॥ तेव्हां याजवरून यमाजीपंताचा तडाका चुकविण्यास कोणीहि समर्थ होणार नाहीं. सर्वांस मृत्युवश उदायें लागतें. मोठा झूर, धीर, व गंभीर पुरुष असला तथापि मृत्यू पुढे त्याची अक्कल गुंत होऊन जाते. मृत्यूचें स्थरूप फार भयंकर आहे. पण जंगलांतील मांसभक्षका दें त्या यःकश्चित प्राण्यास मनुष्य जेवढा भितो तेवढा या मृत्यूचें स्वरूप जाणीत असतांहि मीत नाहीं. व्यात्रीय तिष्ठति जरा परितर्जयंति । रोगाश्च शत्रत्र इव प्रदरांते देहं || आयुः परिस्रवति भिन्नघटादिबांमो । लोकस्तथाप्य हिसमाचरतीति चित्रं ॥