Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रंजन केले असा जनसमुदाय स्मशाना पर्यंतच येतो, अनेक पौष्टिक औषधांनी पुष्ट राखलेला व सुगंधित द्रव्यांनीं मर्दून सतेज ठेविलेला देह चितेमध्ये रहातो, आणि शेवटी आपल्या पापपुण्यानुरूप सुख दुख: भोगण्या करितां जीवाला येवढेंच जावें लागते.” मोठे संपत्तीमान, तपो- धन, दीर्घायुषी, पराक्रमी, भगवदंशी, व पुण्यलोक हे सर्व एकएकटेच गेले. एका कवीने झटले आहे- - रावणा सारीखी कोणाची संपत्ती । तोहि गेला अंतीं येकलाची ॥ येकलाचि गेला वाळी तो बान्नर | कवि थोर थोर तेहि गेले ॥ थोर थोर गेले थोरा वैभवाचे । फार आयुष्याचे ऋषेश्वर ॥ ऋषेश्वर गेले मार्कंडेया सारीखे। इतरांचे लेखे कोण करी ॥ कोण करी तरी शाश्वत आपुलें | कौरवांचें गेलें राज्य सर्व || कौरय निमाले पांडव गळाले । यादव ते गेले येकसरें || येकसरें गेले एकामागे एक | हरिश्चंद्रादिक पुण्यलोक || पुण्यशीळ गेले कीर्ती ठेवोनीयां | पापी गेले वायां अधोगती ॥ तेव्हां अशीं मोठमोठी जबरदस्त पार्टी हं हं झणतां मृत्युच्या मुखांत आपण झाली. से मेले त्यांस स्मशानांत पोंचून त्यांच्या आतादिकांनीं रडत मागें यायें व कांही दिवसांनी त्यांगोंदि तीच जागा शोधीत जायें असा क्रम आहे. रामदासांनी झटले आहे. मरे येक त्याचा दुजा शोक वाहे || अकस्मात तो ही पुढे जात आहे || तेव्हां हें मृत्यूचे राहाट गाडगेंच आहे, जो जन्मास आला तो मर णार व मेला तो पुनः जन्मास येणार अशी ही परंपरा आहे. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनं ॥ अशा तऱ्हेचे जन्ममरणाचे क्लेश प्राण्यास भोगलेच पाहिजेत, हे चुकणे सहपुण्याईचें फल होय, झुका सारखे ब्रह्मनिष्ठ, वसिष्ट वामदेवा सारखे