पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ नामसंकीर्तन नामसंकीर्तन साधन हे सोपें ॥ अळतील पापें जन्मांतरीचीं ॥ (तुकाराम) गतवर्षाच्या तिसया अंकांत ' नवविधा भक्ति' या विषयावर काहीं विचार वाचकांस सादर करून त्या नवविधा भक्तीत अमुक भक्ति श्रेष्ठ व अमुक कनिष्ट असा कित्येक लोकांनी दुराग्रह माजपून व आपले मता स कांहीं साधक प्रमाणे घेऊन भक्तिमागीतील सरळ व साधे पणाचा पूर्वापार संबंध मनांत न आणतां कसा घोटाळा केला आहे व त्या योगा ने लोकांत द्वैतभाव आणि अज्ञान कसें माजत चालले आहे या विषयीं कांही विचार करण्याचे अभिवचन दिलें होतें. त्या प्रमाणें आजच्या प्रसंगी ' नामसंकीर्तना' विषय चार शब्द लिहूं. 6 या नवविधा भक्तिमार्गाचा अन्योन्य संबंध असा कांहीं निकट आहे की, त्यांतील एका विषयीं विचार करूं लागलें झणजे ओघाने सहज अन्य मार्गाचे विवेचनाचा त्यांत संबंध येतोच, या करितां आज जरी आलो या एकाच भक्तिमार्गाविषयी विचार करणार आहों, तथापि त्यापासून सहाजीक त्यांत इतर भक्तिमार्ग विषयींहि लिहावें लागणार आहेच. आता या नामसंकीर्तनाच्या श्रेष्ठत्वाबद्दल मोठमोठचा जबरदस्त पंडितांनीं शेरे मारून ठेविले आहेत. या जगांत अज्ञानी लोकांचा भरणा फार अस ल्यामुळे त्यांची स्थिति शुद्ध मेंढरांसारखी असते. एखादा पुढारी होऊ न तो एखाद्या मार्गानें जाऊं लागला ह्मणजे ही मंडळी आपली त्यावे पाठीमागून जाणार. मग त्यांत आपण खाडचांत पडत आहों किया आपले बचावाचा त्या गोष्टींत काही मार्ग आहे याचा विचार देखील करावयाचा नाही. लोकांचा भरंवसा बहुधा जुन्यावर फार असतो यामुळे एखादा नवीन पंथ उपस्थित करावयाचा झाला, किंवा चालू असलेले कित्येक गोष्टींत कांडी फेरफार करावयाचा झाला झणजे आपले मतास