पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ . आर्यबधिर, या सर्वाविषयों यथामति विचार सादर करण्याचें मनांत आणून हे लहानसें पुस्तक प्रतिमासी प्रसिद्ध करण्याची सुरवात केली. पुढे या कृत्यास देशबांधवांकडून जी मदत मिळाली, व असल विचार वाचणे, ऐकणे आणि त्यांचे मनन करणे या लोकांची जो जिज्ञासा दिसून आली त्याजवरून आपले काम अंशतः तरी लोकांस पसंत पडून ते आपणास उतेजन देत आहेत हे पाहून फार समाधान वाटलें, यहा हें क्रम सतत चालविण्याविषयी उत्साह बुद्धी उत्पन्न झाली. परमेश्वर कृपेनें या पुस्तकाचें एक वर्ष पूरे होऊन दुसरे वर्षाला सुर वात झाली आहे. प्रत्येक गोष्टीचे आद्यती ईश्वाराचे स्मरण करून य त्याची " कतुमकर्तु अन्याथा कर्तुं " ही शक्ति मनांत आणून आपले हातून अहंपणादि मनोविकारां पासून उत्पन्न होणारे जे उन्माद ते न होऊ देण्याविषयी आणि झालेले व्यसतील त्यांची क्षमा करण्या विषयीं ईश्वराची प्रार्थना करणे हा मनुष्याचा धर्म होय. याकरितां तसे करणे योग्य जाणून या ठिकाणी चार शब्द लिहिले आहेत. ज्या प्रमाणें गतवर्षी आह्मी आपल्या देशबांधवांची सेवा अल्प वार्षिक वेतनानें बजा विण्यास प्रवृत झालों व ती परमेश्वराच्या कृपेनें शेवटास नेली, तद्वत या सालींहि आह्मी केलेला आरंभ नियमित वेळीं व योग्य रीतीनें परमे श्वरानें शेवटास न्यावा अशी त्याची प्रार्थना आहे. आझी मनुष्यें जें कांहीं करतों, लिहितों, बोलतों, पहातों, ऐकतों, य मनन करतों, ही सर्व त्या जगदीश्वराची सत्ता होय. एका कवीने झटले आहे.- . - अवघा बोले चाले हरो । ज्याची कथा तोची करी || होत्रोनीयां श्रोता बक्ता | करी आपुली आपण कथा || तेव्हां असा सर्वशक्तिमान व सर्व सत्तात्मक जो प्रभु यास विसरणें हैं महत्पाप होय. असें संयंत्रांनी ध्यानात ठेवून ऐहिक व्यवहार चालवावे,