पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परत भेट नाना फडणविसाचें शहाणपण पहाण्याकरितां टिपु सुलतानानें थोडेसे निवडक चांगले जोंधळे त्यास नजर पाठविले. नानांनी ती भेट पाहून त्यास फार आश्चर्य वाटले व या भेटीत कांहीं तरी मतलब असावा असा न्यास संशय येऊन लगेच त्याने आपल्या एका आश्रितास बलाऊन आणले आणि त्या जोंधळ्यांच्या लाह्या करून अलेले मनुष्याबरोबर सुलतानास परत पाठविल्या. टिपु सुलतान दरबारांत बसला असतां नानाकडून लाह्या घेऊन जासद आला. नानानें परत पाठविलेटी भेट पाहून दरबारी मंडळीस नानाचे वेडेपणाबद्दल वाईट वाटले. पण याचा मुलतानास राग वगैरे न येतां तो उलट नानाचे शहाणपणाची तारीफ करूं लागला. पुढे मंडळीने यांचा अर्थ काय ह्मणून विचारतां सुलता- नानें सांगितले की, मी नानास जोंधळे पाठऊन दिले त्यांत माझ्या पदरीं कसे निवडक लोक आहेत हें दर्शविण्याचा मात्र होता तो जाणून नानानें लाह्या पाठयित्र्यांत मला असे दर्शित केले की, त्या लोकांच्या मी क्षणांत लाह्या करून टाकीन. पाणिग्रहण. - - G शाहू महाराज बादशाहाचे कैदेत असतां एकदा बादवाहानें शाहूचे दोन्ही हात धरून झणाला – शाहू, आतां तुझें संरक्षण कोण करील? --- शाहू फार धूर्त व समयोचित भाषण करणारा होता. त्याने सांगितलें -- खाविंद, आजपर्यंत मला संरक्षणाची काळजी होती. पण आतां ती अगदी दूर झाली. कारण स्त्रियेचा फक्त एक हात धरला तर पिचें जन्मपर्यंत संरक्षण करावे लागतें; आपण तर माझे दोनहि हात धरलेत तेव्हां आतां मी निष्काळजी झालो. हे ऐकून बादशाहा फार खुष झाल य अशा चतुरस्र पणानेंच त्याची शाहूवर फार प्रीति बसली होती.