Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भास्करपंताची पणती, यासुदेवरावाची नात, जगन्नारवंताची मुलगी, - गंगा - लक्ष्मीरूप - अलंकार घातलेली, जिचे प्रज. पति दैवत, धर्म आणि प्रजा यांत वाढवील अशी, मी तुजकारणे दान करितों. याजवर यराचे उत्तर कन्या प्रतिगुण्डामि. या कन्येचें मी गृहण करितो. नंतर सासरा जांवयास ह्मणतो:-- अर्थ - || विश्वंभरः सर्वभूताः साक्षिण्यः सर्वं देवताः। इमां कन्यांप्रदास्यामि पितॄणां तारणायच ॥ तुभ्यं विप्र मया दत्तां पुत्रपौत्र प्रवर्धिनी || धर्मेच अर्थेच कामेच नातिचरितत्र्या त्वयेधयं मर्थ – हे ब्राह्मणा, परमेश्वर, तशींच पंच महाभूतें, व सर्व देवता. यांच्या साक्षीने पुत्रवत्रा वाढविणारी अशी ही मी आपली कन्या पित- रांच्या तारणा प्रीत्यर्थ तुला दिली. आतां तूं इला धर्माविषयी, व अर्थाविषयों, व कामाविषयीं, व्यतंर देऊं नको. याजवर जांयाचें उत्सर. नातिचरामि, नातिचराभि, नातिचरामि “अंतर देणार नाहीं." असे विचार ह्मणावयाचें. स्वस्ति ( शुभ असो.) याममाणे दान झाल्यावर मुलीचे गळ्यांत मंगळसूत्र बांधितांत ग नवण्यास दानें देऊन त्याचा बहुमान करितात. नंतर पाणी ग्रहण ह्मणजे मुलीचा हात मुलाचे हातीं देतात. व शेवटी ह्या आणि तूप यांचा थोडासा होम कारतात, त्यांतील मुख्य देवताः- अपमानं, अग्नि प्रजापति, वरुणानिं, पुरुषामि, अर्थमामि, या आहेत. नंतर तांदुळाच्या राशी करून त्याजवरून नवरोस सात पाय चालवितात. ही ७ पावले नवम्याबरोबर आयुष्य मर्यादेपर्यन्त राहत्रयाची सूचक माहेत. या ठिकाणी विवाह संस्कार समाप्त होतो,