पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ मातृकापूजन. ९ नांदीश्राद्ध. १६५ १७ उपासना. १८ ऐरणीदान. १९ गृहप्रवेश (मुलीला पहिल्यानें सासण्यास नेणे.) या खेरीज दांतवण, रासन्हाणी, सुनमुख, पायघडचा वगैरे मानापमा- नाचीं अनेक कृत्ये वरील विवाहकर्मात सारखींच प्रमुख बनून राहिली आहेत. परंतु त्यांस शास्त्राधार नसन तो केवळ शिष्टाचार आहे. असो, पर जी विवाह कर्मे सांगितली त्याची क्रिया खाली अनुक्रमानें दिली आहे.-. ● वाश्चिय- (मागणी) हे लग्नाचे दिषशी करतात. गुजराथी लोकां- मध्ये याचा प्रचार आहे. त्यांच्यांत लग्नाचे पूर्वी पुष्कळ दिवस मागणी करून ठेवितात व पुढें नवरा नवरी चांगली समजुतींत व वयांत मालीं झणजे विवाह करितात, आपल्या लोकांत याचा सांप्रदाय नाहीं. वास्तविक पाहिले असतां हो चाल फार जलदीची व सोईची आहे. या विधीचे योगानें नवरानवरीचा विवाह करण्या विषयीं त्यांचे पालन कर्ते परस्परांस याचादत्त होतात. कितीडी घाईने लग्न ठरलें व तें ताबडतोब व्हावयाचें असले तथापि हा वाग्दानविधि व्हायाच लागतो. घाणा - हा एक वृद्धाचार आहे झणून वर सांगितलेंच माहे. तसेंच उष्टी हाळद झणजे नवव्यास लावलेली हळद शिल्लक ठेऊन ती नवरीला लावण्या करितां न्यावयाची, रुखयत झणजे यगस विषाहा करितां आपले घरांतून निघण्यापूर्वी कन्येचे आईनें द्यावयाचें जेवण, बगैरे हेही वृद्धाचार ह्मणून पूर्वी सांगितले आहेच, - मधुपर्क - कात्यायन सूत्रांत लिहिले आहे कीं, गुरु, यज्ञास बला- बिलेला ब्राह्मण, जांबई, राजा, मित्र व ब्रह्मचारी, पांची मधुपर्क पूजा करावी, ही पूजा दरसाल करावी, असेंही कात्यायनाचे मत आहे