Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ , अलीकडे आपल्या देशांत सार्वजनिक हिताची फार चळवळ दिसते. आपल्या देशांतील संपती नष्ट होऊन लोक दरिद्री झाले, व्यापारधंद्रा बुडून लोक रिकामे बसले व अनेक प्रकारच्या दुष्काळादिक घाल्याने लोक अन्नास मोताद होऊन पाप मरूं लागले. या देशावर प्रस्तुत परद्वीपथांचा अम्मल असल्या मुळे कित्येक तद्देशी कामदार लोकांवर जुलम करून त्यांची दाद घेत नाहीसे झाले व आमचे दयाळ सरकार • फार दूर असल्यामुळे आमच्या हालअपेष्टा त्यास कळतना, तेव्हां अशी ही दीनावस्था अवलोकन करून कित्येकांनी सार्वजनिक वकिलीपत करली. आणि हे स्वतः सिद्ध मुखरवार वकी, सरकार व रयत यांस शास्त्रार्याच्या आणि समजुतीच्या गोष्टी सांगून बयाणा, कमिशन, व इना म वगैरे मिळवूं लागले, वर्तमानपत्रे, मासिक पुस्तकें, त्रैमासिक, सार्व अनिक सभा, लबाद कोर्डे, वक्तृत्वोतेजक समा, वगैरे हों या वकिलांची को होत. वरील सर्व क्त्यांचा उद्देश सार्वजनिक हित संपादण्याचाच होय. तेव्हा आतां सार्वजनिक हित कोणते, तें संपादण्यास उपाय काय, व प्रस्तुतच्या चळवळीनें तें संपादिले जाईल किंवा नाहीं याचा विचार करूं. सर्व लोकांवें जेंदित तें सार्वजनिक हें कोणीही कबल करील. पग सर्व लोक यांत कोणाचा समावेश होतो हे पाहिले पाहिजे. साधारण शब्दार्था प्रमाणे झटले असतां सर्व लोक ह्मणजे दुनियेतील सर्व मनुष्यें असा अर्थ ध्वनित होतो. तेव्हा आपल्या देशांत सार्वजनिक कल्याणा ची जी चळवळ चालू आहे ती आपल्या देशांतील लोकां करितां किंवा दुनियँतील लोकांचे कल्याणासाठी दिले पाहिजे, याचा विचार करूं लागलें असतां आपल्या देशांतील सार्वजनिक हित चिंतकांने सर्व यत्न केवळ स्वदेशहितार्थ आहेत असे ह्मणावे लागते. स्पावेस्टर वगैरे परदेशांतले व्यापारी अनेक तऱ्हेचें कापड तयार करून या देशांत स्वस्त भावाने आणून विकतात, यामुळे या देशांतील माग वगैरे बंद होऊन लोक