पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३५ खरोखर घातक न दुःखमलक आहेत. व त्या करणे हा भगदी वेदेवणा आई से मनुष्य जाणीत असतांहि तें करण्यास प्रवृत्त होतो शेवट करून पस्ताव्यांत पडतो, तेव्हां पाला प्रारब्ध न झणावें काय? हें प्रारब्ध तीन प्रकारचें आहे:- - इच्छाप्रारब्ध, अनिच्छाप्रारब्ध, आणि परेच्छा प्रारब्ध, असे प्रारब्धाचे तीन प्रकार आहेत. एखादें कृत्य घातक दुःखमूलक आहे असे मनुष्य जाणीत असतां, व तशा प्रकारची कृत्ये ज्यांचे हातून झालीं ते पुरुष व्यसनांतच पडले अर्सी उदाहरणें डोळया देखत घडत असतां हि मनुष्य इच्छा बलानें तें कार्य करण्यास प्रवृत्त होतो तेव्हां त्यास इच्छा प्रार असें ह्मणतात. कुपथ्ष करणारा रोगी, चोर, आणि राजपलीचा जार, हे आपण जे कृत्य करतों त्या पासून आपला नाश होईल असें जाणीत असतांहि इच्छा प्रारब्याचे योगानें तें कृत्य करण्यास प्रवृत्त होतात. "स्वभावतःच स्वप्रारब्वानें बद्ध झालेला पुरुष जे कृत्य करावयास इच्छित नसतो, व जें करण्यात महत्वाप आहे असें जाणून लोकांसहि उपदेश करतो, अस। पुरुष रजतमादि गुणांपासून उत्पन्न झालेले जे काम क्रोधा. दिक त्यांच्या प्रावल्याने अविवेकी व पराधीन होत्साता इच्छा नसताहि एखादें कृत्य करण्यास प्रवृत्त होतो तेव्हां त्यास अनिच्छा प्रारब्ध असे झणतात, इच्छा करून अथवा इच्छा न करतां प्राप्त झालेल्या दुःखाप्रत भोगीत नाही, तर केवळ दुसऱ्याच्या इच्छेनें बद्ध होऊन त्याप्रीत्यर्थच दुःख भोगण्यास प्रवृत होतो, अशा प्रसंगास परेच्छा प्रारब्ध असें ह्मणतात. ते हां असें हें तीन प्रकारचें गारब्ध आहे. या प्रारब्य रज्जनें सर्व लोक बांधले गेले आहेत. आतां याजवर कदाचित अशी शंका येईल की, ज्ञानी आणि अज्ञानी यांज मध्ये वर जें महदंतर सांगितले त्यास या प्रार ब्ध बलतवरपणाचे योगानें विरोध येतो. कारण, प्रारब्धानुसार सुकृत करण्यास किंवा सुखदु:ख भोगण्यास जर सर्व जीव सारखेच पात्र आहेत तर मग आज्ञान्यापेक्षां ज्ञासाकडे श्रेष्ठ कां असावें? ज्ञानी