Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जर अज्ञान्यापेक्षां श्रेष्ठ आहे, तर त्या निग्रह करून आपल्या ज्ञानशं खानें मारब्धरज्जूचा छेद करून टाकावा असें मनांत येतें, परंतु ही भ्रांती आहे. कारण संपूर्ण भूतें हीं प्रारब्धानुरोधानें वागणारी अ सल्यामुळे आणि प्रारब्ध हैं ईश्वर नियमितत्र असल्यामुळे त्याचा पारे हार करण्यात मनुष्य असमर्थ आहे. नळ, धर्मराजा, आणि रामचंद्र हे महान पराक्रमी आणि ज्ञानी असतांहि अवश्य भावितेचा प्रतिकार करण्यास समर्थ झाले नाहीत, आतां यावरून असे मात्र कोणी समजूं नये, किं ज्ञानी आणि अज्ञानी है प्रारब्याचा परिहार करण्यास सारखेच असमर्थ आहेत, तर मग ज्ञान संपादन करण्याच्या भानगडींत विनाकारण कां पडावें? अशा प्रकारची समजूत ही बेडेपणाची आहे. कारण, ज्ञानी आणि अज्ञानी यांचे मागें जरी प्रारब्याचा फेरा सारखाच आहे, तथापि ज्ञानी हा सारासार विचारानें वागत असल्यामुळे ‘मी कर्म कर्त्ता मी भोक्ता' इत्यादि दुःखास अधिष्ठान रूपी जो अहंपणा त्याच्या त्यागानें प्रारव्यजन्य व्यसनास भोगीत नाहीं. तसेंच इच्छानिच्छादि प्राराचे योगानें तो जरी एखाद्या अयुक्त कर्मास प्रवृत्त झाला अथवा व्यसनांत सांपडा तथापि विवेक शक्ती मुळे त्याचे हातून निँय कर्म होत नाहीं. अर्थात् तज्यन्य दुःखातें तो पातत नाहीं. नल, धर्मराजाद, व्यसनांत सांपडले असतांहि ते अपल्या सत्या पासून भ्रष्ट झाले नाहींत. प्रकृत प्रसंगास अनुकूल अशी एक गोष्ट आह्मी ऐकलेली स्मरत - एक चांगला विद्वान ब्राह्मण एका श्रीमंताचे घरीं उतरण्यास गेला असता त्या श्रीमान भल्या गृहस्थानें या विद्वानाची चांगली उठबस करून त्यास आपले येथे आठचार दिवस रा हचून घेतलें. ब्राह्मण चांगला जाता व विचारी होता, परंतु प्रारब्ध योगानें त्या श्रीमंताचे घरची संपत्ती पाहून त्याचे चित्ताला मोह उत्पन्न झाला, या पैकी कांदी संपत्ती यजमानास न कळत रात्रीं पसार कर व्याचा वरील विद्वान गृहस्थांनी निश्चय केला. पुढे रात्री घरांतील सर्व -