Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ तेथें पाणीच आहे असें निःसंशय वाटे. त्याच प्रमाणे कांही ठिकाण जमीनीत पाण्याचा सांठा करून ठेविला होता तेथें ती जमीन आहे असे याटे, व्यासादिक माहितगार व ज्ञानी लोक जेव्हां त्या सभा मंडपांतून जाऊं लागले तेव्हां ते नीटपणे गेले. पण दुर्योधन व त्याचे संगती जेव्हां तेथून जाऊ लागले तेव्हां तेथें दिसण्यांत पाण्याप्रमाणे केलेले जमीनीस तें पाणीच आहे अशा बुद्धीनें ते आपली यस्त्रादिक सावरू लागले व त्या जमीनीवर पाय टाकतात तो ते पाणी नसून जमीनच आहे असा अनु भव आला व आजूबाजूचे लोक हांसले तेव्हां त्यांस मोठी शरम झाली हां खरोखर पाण्याचा भाग आला तेव्हां पाण्यासारखी दिसणारी ती जमीनच असेल अशा समजुतीने यस् वगैरे न सांवरतां सहज रोतोनें तेथे पाय टाकतांच अडखळून पडले व कपडेलत्ते भिजून जाऊ न फजित पापले व्यातां यावें कारण काय, केवळ, अज्ञान, असें नाहीं को ण ह्मणेल? प्रपत्र डी ईश्वर नियमित सभा आहे, यांत अनेक सुख दु:खा श्रीं व सोयोवीं आणि अडचणीचीं स्थळे आहेत. जो ज्ञाता आहे तो तीं स्थळे माणतो. आणि त्या त्या स्थळी योग्य रीतीने गगन पार पडतो पण जो अज्ञानी आहे, तो त्यांतील सुख दु:खा विषयों गैरमादित अस त्यामुळे ज्यापासून सुख होण्यासारखे असेल तें ठिकाण दुःखमूल आहे असे समजन त्याच्या त्यागाने दुःख पावतो व ज्यापासून खरोखर दुःखच होणार अशा वस्तूचे ठिकाणीं सुखाचा भास जाणून त्याचा स्वीकार करतो, अर्थात त्यामुळे तो दुःखच पावतो. तेव्हां ज्ञानी आणि अज्ञानी यांजमध्यें असा मेह आहे. आणखी ही एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे की, पूर्वोत्त मयत सर्व लोक गेळे नसतील व त्यांना जाण्याचे हि कारण पडलें नसेल; पण या ईश्वरनियमित प्रपंचरूपी मयसभेचा प्रकार तसा नाहीं. मनुष्यमात्रास या प्रपंचांत आलेच पाहिजे आणि त्यांतील ठिकाणे व देखाये पहाण्यासाद प्रारब्धानुसार झिंडलें पाहिजे. मातां प्रारब्वानुसार झणण्याचें कारण इतकेंच की, काही गोष्टी